आजकाल सर्व काही डिजिटल होत आहे. ऑनलाईन व्यवहारामुळे जीवन सोपे झाले आहे. तुम्ही तुम्ही कोणतीही रोख रक्कम न घेताही बाजारात खरेदी करू शकता किंवा तुम्हाला भाजीपाला, फळे किंवा कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाइन पैसे भरून तुमचे काम करू शकता. सर्वत्र ऑनलाइन पेमेंट स्विकारतात. आता बंगळुरूमधील (Bengaluru) एका ग्राहकाने असाच काहीसा अनुभव शेअर केला आहे.
एका ऑटोचालकाने (auto driver) पेमेंटसाठी चक्क त्याच्या स्मार्टवॉचवर (smartwatch) QR कोडद्वारे (QR code) दाखवला. ग्राहकांसाठी हे सर्व अनपेक्षित होते त्यामुळे तो थोडा चकीत झाला आहे. एका ग्राहकाने स्मार्ट वॉचवर पेमेंटचा क्युआर कोड दाखवणाऱ्या रिक्षा चालकाचा फोटो शेअर केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका प्रवाशाने ‘नम्मा यात्री’ सेवेचा पर्याय निवडला आणि पेमेंट करण्यासाठी ऑटो चालकाला QR कोड विचारला तेव्हा त्याने स्मार्ट वॉच दाखवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ड्रायव्हरने फक्त त्याचे स्मार्टवॉच दाखवले नाही तर त्याच्या स्क्रीनसेव्हर म्हणून QR कोड सेव्ह केला होता. रिक्षाचालकाचा हा अंदाज पाहून ग्राहक चक्रावून गेला आहे. रिक्षाचालक इतके स्मार्ट असू शकतात याची कल्पना केली नसेल त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
हेही वाचा – Googleने कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलं हॉटेल! ऑफिसमध्येच राहा, खा, प्या आणि झोपा; एका रात्रीसाठी आकारणार ‘एवढं’ भाडे
X वर पोस्ट केलेला फोटो ३३७.८k पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोवर सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. या स्मार्ट हॅकसाठी युजर्स ऑटो चालकाचे कौतुक करत आहेत. बंगळुरूमधील लोकांनी घेतलेल्या अनोख्य अनुभवांच्या यादीत या घटनेची भर पडली आहे. युजर्सनी सोशल मीडियावर अशाच अनुभवांच्या कथा शेअर केल्या.
हेही वाचा – बाळाला असं कोण शांत करतं? बाळाचे रडणे थांबवण्यासाठी आईने चक्क दुधाच्या बाटलीत ओतली दारू अन्…
मुंबईतील एका वापरकर्त्याने ऑटो-रिक्षा चालकाची एक घटना शेअर केली ज्याने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्याचा UPI-QR फोन वॉलपेपर म्हणून सेव्ह केला होता.