Auto driver Singing English Song: अनेक गाणी अशी असतात की, ज्यांचे बोल थेट काळजाला भिडतात. अशी गाणी एकदा ऐकल्यानंतर लोकांना ती पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतात. दरम्यान, भारतात इंग्रजी गाणी ऐकणारे लोकांची संख्या त्या मानाने कमी आहे. कारण- या गाण्यांचे बोल समजायला अनेकदा कठीण जातात. पण, एका रिक्षाचालकाला या इंग्रजी गाण्यांची भुरळ पडल्याचे पाहायला मिळत आहे. रिक्षाचालकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात भरट्रॅफिकमध्ये रिक्षाचालक इंग्रजी गाण्याचे बोल पुन्हा बोलताना दिसत आहे.

रिक्षाचालकाचे इंग्रजी गाण्यावरील प्रेम

गाणे गुणगुणण्याची आवड असेल, तर व्यक्ती कठीण गाणेही सहजतेने शिकते आणि गुणगुणू लागते. हेच या व्हिडीओतूनही दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, बंगळुरूमधील एक रिक्षाचालक भरट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना ‘ए थाउजंड इयर्स’ गाताना दिसत आहे. हे प्रसिद्ध इंग्रजी गाणे अमेरिकन गायिका आणि गीतकार क्रिस्टीना पेरीने यांनी गायले आहे. दरम्यान, रिक्षाचालक ते गाणे गुणगुणण्यात इतका हरवून गेला आहे की, त्याला आजूबाजूच्या गोंगाटाची काही फिकीर नसल्याचे दिसतेय. ही व्यक्ती अगदी बिनधास्तपणे आपली आवड व्यक्त करताना दिसतेय. त्या रिक्षाचालकाचा हा बिनधास्तपणा आता अनेकांना आवडतोय.

Man hit a car while seeing in mobile on road shocking accident video viral
कोणाचं कर्म कोणाला भोगावं लागलं; गाडी चालवताना मोबाईल बघायची सवय असेल तर हा VIDEO पाहाच, घडलं भयानक
Swiggy Delivery girl viral video of delivering food from scooter emotional video on social media
वडिलांच्या पैशाने आणि…, डिलिव्हरी गर्लचा ‘हा’ VIDEO पाहून…
Viral Video Of Street Dog
VIRAL VIDEO : ‘चल सोडतो तुला… ‘ श्वानाला दिली थेट गाडीत बसण्याची ऑफर; व्हिडीओतून पाहा नक्की काय घडलं
Mane aajoba sell aale wadi by walking in market at age of 99
वय ९९ वर्ष, ना बीपी ना शूगर अन् कष्टाला तर अजिबात तोड नाही! नगरचे माने आजोबा भर बाजारात पायी फिरून विकतात आले वडी, पाहा VIDEO
Son showed the god to his mother Video will bring tears to the eyes of every mother and child
आई नावाच्या देवाला त्यानं मंदिरातला देव दाखवला; VIDEO पाहून प्रत्येक आई अन् मुलाच्या डोळ्यांत येईल पाणी
obscene video of a young woman vulgar dance in front of india gate new delhi viral video on social media
VIDEO: “अगं काहीतरी लाज बाळग”, भररस्त्यात टॉवेल काढलं अन्…, तरुणीचा अश्लील डान्स पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Auto driver written a Funny message on back side of his auto goes viral on social media
“भावकी…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की लोक म्हणाले, ‘बरोबर बोललास भाऊ…’ PHOTO पाहून तुम्हीही हसाल
little boy shaking his head while listening to the bhajan
‘बालपणातील संस्कार आयुष्य घडवते…’ भजन ऐकून मान डोलावणारा चिमुकला VIRAL VIDEO तून तुम्हीसुद्धा बघा
Marathi school board thought on Maharashtra Assembly Election 2024 This Marathi school board will make you think video viral
PHOTO: “सरकार कोणाचे का असेना पण…” मराठी शाळेतील ही पाटी विचार करायला भाग पाडेल; प्रत्येकानं एकदा नक्की वाचा

भर ट्रॅफिकमध्ये गुणगुणत होता इंग्रजी गाणी

हेही वाचा – असे रेस्टॉरंट जिथे ‘कुछ नही’, ‘कुछ भी’ खाण्यासाठी द्यावे लागतात पैसे; VIDEO तील मेन्यू लिस्ट पाहून तुम्हीही चक्रावाल

हा व्हिडीओ नीरजा शाह (@Neerjargon) या एक्स अकाउंटवरून शेअर केला गेला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “प्रत्येकाला @christinaperri आवडते. त्याचा हा पुरावा पाहून खूप आनंद झाला.” व्हिडीओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्वा, क्या बात है, याला आवड म्हणतात. तो इंग्लिश लिरिक्सही कॉपी करतोय.” दुसऱ्या युजरने लिहिले, “हे पाहून खूप आनंद झाला. हे गाणे आमच्या काळातील सर्वोत्तम गाण्यांपैकी एक आहे.” त्याच वेळी तिसऱ्या युजरने व्हिडीओ पाहिल्यानंतर लिहिले, “भाई, जगातील सर्व प्रेमास पात्र आहे.”