Auto Driver Offers Tips For Personal Growth : अनेकदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी आपण सगळेच रिक्षाचा उपयोग करतो. यादरम्यान काही रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये गप्पागोष्टी सुरू होतात. त्यांचा रिक्षा प्रवास का सुरू झाला? त्यांचा छंद होता की जबाबदारी, असे अनेक प्रश्न त्यांच्या या रिक्षा चालवण्याच्या कहाणीमध्ये लपलेले असतात. प्रवासी अगदी विश्वासू वाटला, तर काही रिक्षाचालक त्यांच्या जीवनातील गोष्टी अगदी मनापासून शेअर करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका तरुणीला रिक्षाचालकाने त्याची गोष्ट सांगितली आहे.

आरजे आलोकिता (RJ Alokita) ही मुंबईची रहिवासी तिच्या अलीकडच्या प्रवासादरम्यान रिक्षाने जात होती. त्यादरम्यान एक रिक्षाचालक तिच्याशी गप्पा मारताना दिसला. अण्णा नावाने ओळखला जाणारा हा रिक्षाचालक चेंबूरपासून पनवेलपर्यंत सर्वांना ओळखतो. रिक्षाचालक व्यवसायाने रिअल इस्टेट एजंटदेखील आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईत त्यांचे स्वतःचे दोन फ्लॅट आहेत. रिक्षाचालकाने सांगितलेली त्याची गोष्ट व जीवनविषयक सल्ला व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा.

हेही वाचा…ट्रॅफिकमध्ये विनाकारण हॉर्न वाजवल्यावर काय होतं? KBC स्टाईलमध्ये रिक्षा चालकाने विचारला प्रश्न; पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल थक्क

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हे रिक्षाचालक प्रेमळपणे प्रवाशाशी बोलत आहेत. गप्पा मारताना अण्णा यांनी केवळ त्यांची कथाच सांगितली नाही, तर काही सल्लादेखील दिला. “तुम्ही सगळ्यांनी आई-वडिलांचा आदर करा; जो आपल्या आई-वडिलांना समजून घेतो, तो प्रत्येक गोष्टीचे पालन करतो. दिवसेंदिवस तुमचे जीवन कठीण होत जाईल. पण, जीवनात यशस्वी होण्यासाठी डॅशिंग राहा आणि कोणावरही विश्वास ठेवू नका”, असे त्यांनी प्रवासाच्या शेवटी सांगितले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आरजे आलोकितासाठी (RJ Alokita) @rjalokita या मुंबईच्या तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ शेअर करीत तिने, “चेंबूरच्या अण्णांना भेटा; जे त्यांचा छंद म्हणून रिक्षा चालवतात. काल घरी परतताना तरुणीने विद्याविहार रेल्वेस्थानकावरून रिक्षा पकडली आणि तेव्हा तिची या रिक्षाचालकाबरोबर भेट झाली. रिक्षाचालक वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाला नमस्कार करीत होता. सर्व जण त्याला ओळखत असल्यासारखे प्रेमाने उत्तर देताना पाहून तरुणीला आश्चर्य वाटले. त्यामुळे तरुणी तुम्ही इथे सगळ्यांना ओळखता का? असं विचारते आणि त्यांच्यातील गप्पा सुरू झाल्या. तुम्हाला कुठेही प्रेरणा मिळेल, फक्त तुमचा शोध चालू ठेवा, अशी कॅप्शन त्या तरुणीने व्हिडीओला दिली आहे.