Viral news: आपल्या घराचा सगळ्यात मोठा आधार हे बाबा असतात. संपूर्ण कुटुंबाची काळजी देखभाल घेण्यासाठी रात्रदिवस मेहनत करत असतात मात्र तरीही मुलं बाबांपेक्षा आईच्याच जास्त जवळ असतात. कारण बापाचं नातं भावनिक कमी आणि कर्तव्य जास्त असतं. बाप म्हणजे धाक दरारा हे पूर्वी अनेकांसाठी समीकरण होतं. आई आपल्या आयुष्याच्या गाडीचं योग्य दिशा देणार “स्टीयरिंग” असतं तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, “वडील” म्हणजे “अर्जेंट ब्रेक” चा पर्याय असतात. अशातच एका व्यक्तीने आपल्या रिक्षाच्या मागे असं काही लिहलंय की वाचून तुम्हीही म्हणाल याला म्हणतात वडिलांवरं प्रेम. या रिक्षाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रिक्षाच्या पाठीमागे लिहलेला मेसेज पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका रिक्षाचा मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सध्या अशाच एका रिक्षावरील मेसेजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वाचून अनेकांना वडिलांची, त्यांच्या कष्टाची जाणीव होत आहे. तर, काहींच्या डोळ्यांत वडिलांच्या आठवणीने अश्रू दाटून येत आहेत. लिहिलेल्या या संदेशामध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते जाणून घेऊ… “प्रत्येक यशस्वी मुलाच्या मागे कष्ट करणारा “बाप” असतो” वडिलांचे एक प्रकारे आभार मानण्यासाठी या रिक्षाचालकानं हा मेसेज लिहला आहे. हा मेसेज वाचून अनेक जण भावूक झाले तर अनेकांना आपल्या वडिलांची आठवण झाली.

पाहा फोटो

https://www.facebook.com/share/1AMMUACpvn/?mibextid=wwXIfr

Royal Maharashtra Majha या नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेक जण या व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये भावनिक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहलं, “ज्याच्यामागे बाप खंबीर आहे त्याला कशाचीच भीती नाही” तर आणखी एकानं, “बाप बाप असतो.”

Story img Loader