Funny Message On Back Side Of Auto Rikshaw Photo Viral : रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा रिक्षा, टॅक्सी किंवा ट्रक, बाईकच्या मागे असे काही भन्नाट कोट्स लिहिलेले दिसतात की, जे वाचून अनेकदा हसायला येते; तर यातील काही कोट्स फार भावनिक, विचार करायला भाग पाडणारे असतात. त्यामुळे वाहनांवरील हे कोट्स अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात चालकाने रिक्षाच्या मागे असा काही भन्नाट कोट लिहिला आहे, वाचून लोकांनी आता आम्ही प्रेमच करणार नाही अशी भावना व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय.
रिक्षावरील कोट वाचून प्रेमीयुगल पडलेत विचारात
या फोटोत तुम्ही पाहू शकता की, पिवळ्या हिरव्या रंगाची एक रिक्षा रस्त्यावर उभी आहे, यावेळी रिक्षाच्या बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यावर लिहिले भन्नाट कोट्चा फोटो कॅप्चर केला, जो वाचून अनेक प्रेमीयुगल विचारात पडलेत की, याने असं का लिहिलं असेल. आता तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल की, रिक्षाचालकानं असं नेमकं लिहिलंय तरी काय?
चालकाने त्याच्या रिक्षाच्या मागील कोपऱ्यात लिहिले की, प्रेम ही एक कला आहे, त्यामुळे करू नका असा माझा सल्ला आहे.’ (प्यार एक कला है, मत कर मेरी सलाह है). कोणीतरी ही ओळ वाचली आणि तिचा फोटो क्लिक केला. मग काय, आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे याची माहिती अद्याप उपलब्ध नाही, पण तो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
पाहा व्हायरल फोटो –
“जीवनाचा खरा अर्थ फक्त ह्यालाच समजला आहे” लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया
हा व्हायरल फोटो @VishalMalvi_ नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘इंडियन ऑटो वाले भैया: एक मूव्हिंग लाईफ लेसन स्कूल.’ दरम्यान, अनेक युजर्सदेखील त्यावर भन्नाट कमेंट्स करतायत. एका युजरने लिहिले की, आता मी प्रेमच करणार नाही, दुसऱ्या युजरने लिहिले की, जीवनाचा खरा अर्थ फक्त ह्यालाच समजला आहे; तर तिसऱ्याने लिहिले की, रिक्षाचालक हे बेस्ट कॅप्शन जनरेटर आहेत.