Viral Rickshaw Funny Dialogue News: रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेकदा ट्रॅकवर, टॅक्सीवर नाहीतर रिक्षावर भन्नाट असं काहीतरी लिहिलेलं वाचलं असेलच. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये रिक्षावाल्यानं रिक्षाच्या मागे जे काही लिहिलंय ते पाहून तुम्हीही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका रिक्षा चालकाने त्याच्या बायकोसाठी रिक्षाच्या मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, याला म्हणतात बायकोचा धाक. या रिक्षाचा फोटोही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतोय.

आयुष्यात एक वेळ पैसा कमी असेल तरी चालेल; पण योग्य जोडीदार असणं महत्त्वाचं आहे. काही जण आपलं नातं नेहमीच नव्यासारखं ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते आपल्या जोडीदाराच्या आनंदाचा नेहमीच विचार करीत असतात. अशातच एका व्यक्तीनं आपल्या बायकोसाठी कारच्या मागे असं काही लिहिलंय की, त्यावरून तो आपल्या बायकोवर किती प्रेम करतोय हे दिसतंय. तसेच ही रिक्षा पाहून रस्त्यावर सर्व बघतच राहिले आहेत.

गाडीच्या मागे असं लिहलंय तरी काय ?

नवरा-बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक; पण लग्न झाल्यानंतर जसं नातं फुलत जातं तशी ही गाठ घट्ट होत जाते. आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवलीय, असा विश्वास जरी असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी नवरा-बायको अशा दोघांनाही प्रयत्न करावे लागतात. नवरा-बायकोचं नातं म्हणजे ऊन-सावलीचा खेळ. कधी रुसवा-फुगवा, तर कधी खळखळून वाहणारा हास्याचा धबधबा. त्यामुळे या प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा हे प्रेम शब्दांत व्यक्त करता येतंच असं नाही. नवराब-बायको जसे सुखात एकत्र असतात तसेच एकमेकांच्या दु:खातही सारखेच भागीदार होतात, तेव्हा ते नातं आणखी टिकतं. असाच प्रयत्न या व्यक्तीनं केलाय. आता तुम्ही म्हणाल, असं काय केलंय त्यानं. रिक्षाच्या मागे त्यानं काय लिहिलंय? तर या व्यक्तीनं आपल्या रिक्षाच्या मागे “प्रिय बायको तुझा विश्वास तोडणार नाही पण दारु सोडणार नाही” असं गमतीशीर पद्धतीने लिहले आहे. यावरु नवरा बायकोचं नात किती हसतं खेळतं आहे याचा अंदाज येतोय.

पाहा फोटो

हेही वाचा >> भयंकर! एका मागोमाग २५ बाईकचा थरारक अपघात; भर रस्त्यात असं नेमकं काय घडलं? VIDEO पाहून थरकाप उडेल

सोशल मीडियावर punekar2.0_og नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला पुणे तिथे काय उणे अशी कॅप्शन देण्यात आली आहे.