Funny Post: भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका रिक्षाचा मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रिक्षाचा फोटोही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतोय.
जगात अशी कितीतरी जोडपी आहेत जी कॉलेजमध्ये असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि हा प्रेमाचा प्रवास लग्न करुन पूर्णत्वास नेतात. एकमेकांसोबतचा हा प्रवास नक्कीच त्यांच्यासाठी संस्मरणीय असतो. पण मित्रमैत्रीणींनो प्रत्येक वेळीच लहान वयात झालेलं प्रेम त्याच्या ध्येयापर्यंत पोहचताना सहजासहजी मार्ग काढेल असं नाही. प्रेमात पडलेली मुलं-मुली डोक्याने विचार करण्यापेक्षा हळवे होऊन मनाने किंवा हदयाने निर्णय घेतात. ज्यामुळे अशा काही गोष्टी घडतात की त्याचा पश्चाताप त्यांना आयुष्यभर करावा लागतो. असं होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच या रिक्षा चलकानं हा सल्ला दिला आहे.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असले की या रिक्षा चालकानं असं काय लिहलंय रिक्षाच्या मागे? तर या रिक्षाचालकानं रिक्षाच्या मागे “प्रेम एक कला आहे करु नका हा माझा सल्ला आहे” असा मेसेज लिहला आहे.या ऑटोचालकाने आपल्या ऑटोच्या मागे असा संदेश लिहिला आहे की, तो पाहिल्यानंतर सर्वांनाच विचार करायला भाग पाडत आहे. यावर तुमचं मत नक्की सांगा.
पाहा रिक्षाच्या मागे काय लिहंलय?
हेही वाचा >> पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
व्हायरल होत असलेली ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर naughtyworld नावाच्या अकाउंटसह शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. त्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्यावर टिप्पणी करताना त्यानं लिहिलं, “एकदम बरोबर” तर आणखी एकानं म्हंटलंय, “भारतीय रिक्षा चालकांचा नाद नाय”