Viral Post: भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका रिक्षाचा मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रिक्षाचा फोटोही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतोय.
रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा ऑटोरिक्षावर, टॅक्सी किंवा बाईक्सच्या मागे काही भन्नाट कोट्स लिहिलेले असतात, जे वाचून अनेकदा खूप हसायला येते. तसेच प्रश्नही पडतो की, या लोकांना एवढं भन्नाट लिहायला सुचत कसं… पण काहीवेळी रिक्षा किंवा काही वाहनांच्या मागे असे काही कोट्स लिहिलेले असतात जे फार भावनिक असतात किंवा तुम्हाला विचार करायला भाग पाडतात, तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील व्यक्तींबरोबरच्या आठवणी ताज्या करतात. त्यामुळे असे कोट्स नेहमीच लोकांचेही लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एका रिक्षावरील कोट्सचा फोटो व्हायरल होत आहे.
या ऑटोचालकाने आपल्या ऑटोच्या मागे असा संदेश लिहिला आहे की, तो पाहिल्यानंतर सर्वांनाच विचार करायला भाग पाडत आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, त्या रिक्षाच्या मागे, असं लिहिलंय तरी काय? रिक्षाच्या मागे लिहिलेला संदेश वाचून कदाचित तुम्हीही त्याच्याशी सहमत व्हाल. “शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही. मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात. आई बापाच्या कष्टाची जाणीव असणारी मुलं कधीच वाया जात नाही.” रिक्षाच्या मागे लिहिलेला संदेश पाहून तुम्हीच सांगा, तुम्ही याच्याशी सहमत आहात का?
पाहा पोस्ट
हेही वाचा >> लाडक्या बहिणींसाठी ट्रेनमध्ये स्पेशल डब्बा; खास महिलांसाठी सजवलेला डबा पाहिला का? VIDEO पाहून खूश व्हाल
व्हायरल होत असलेली ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @marathi_memer नावाच्या अकाउंटसह शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. त्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्यावर टिप्पणी करताना त्यानं लिहिलं, “एकदम बरोबर”