Viral Video Of Auto Rickshaw driver : प्रत्येकाला आपलं वाहन प्रिय असतं. रिक्षा, ट्रक आणि इतर वाहनांमध्ये आकर्षक स्टिकर्सचा उपयोग करून काही वाहनमालक स्वत:च्या गाडीची मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून अशी काही देखणी सजावट करतात की, अनेक जण त्याकडे नकळतपणे आकर्षित होतील. पण, तुम्ही तुमच्या वाहनांवर किती खर्च करू शकाल याचा काही अंदाज लावू शकता का? तर आज अशाच एका रिक्षाचालकाची चर्चा होत आहे; ज्याने लाख रुपये खर्च करून त्याची रिक्षा सजवली आहे. त्याने नक्की असं का केलं असेल? त्यामागचं नेमकं कारण काय? चला जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ ( Viral Video) बंगळुरूचा आहे. शकील या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरला जस्टिन बीबरचा फोटो लावलेली एक रिक्षा दिसली; ज्यामुळे त्याने रिक्षाचालकाला थांबवून त्याची विचारपूस केली. तेव्हा त्यांच्या संवादातून असं कळलं की, सय्यद बाबा हा रिक्षाचालक जस्टिन बीबर या गायकाचा चाहता आहे. त्यानं जस्टिन बीबरसह अनेक कलाकारांच्या स्टिकर्ससह रिक्षा सजवल्याचं दिसत आहे. त्यावरून त्याचं त्याच्या रिक्षावर खूप प्रेम आहे हे लक्षात येतं. त्याचप्रमाणे रिक्षाच्या मागच्या बाजूला तुम्हाला काचेमधून आरपार इंजिनसुद्धा पाहता येईल; ज्याला चंदेरी रंग देण्यात आला आहे. नक्की बघा हा व्हायरल व्हिडीओ.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Mukesh Ambanis daughter Isha Ambani spotted with colour-changing luxury SUV it is worth Rs 4 core
मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीकडे आहे सरड्यासारखी रंग बदलणारी कार! किंमत ऐकून बसेल धक्का….

हेही वाचा…‘बाबा, खूप खूप आभार…’ सरप्राईज पाहून चिमुकला रडला; VIRAL VIDEO पाहून आठवतील लहानपणीचे दिवस

व्हिडीओ नक्की बघा…

रिक्षाचे इंटिरियर :

व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, जेव्हा इन्फ्लुएन्सरने रिक्षात वाकून पाहिलं तेव्हा रिक्षाच्या आतील इंटेरियर पाहून तो थक्क झाला. कारण- रिक्षात जस्टिन बीबर, स्पायडरमॅन, सलमान खान, संजू बाबा (संजय दत्त), माधुरी दीक्षित , ऐश्वर्या राय-बच्चन आदी काही प्रसिद्व कलाकारांसह त्यानं रिक्षाचं इंटिरियर केलेलं पाहायला मिळतं आहे. अगदी रिक्षाच्या चाकापासून ते हॅण्ड-स्टार्टपर्यंतच्या रिक्षाच्या प्रत्येक भागाला त्यानं चंदेरी रंग दिला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला रिक्षावर धूळ किंवा स्क्रॅचसुद्धा दिसणार नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) @shaqontherun या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “रिक्षाचालकाने लाख रुपये खर्च करून स्वतःच्या बाळाप्रमाणे रिक्षाला डिझाईन करून, तिची काळजी घेतली आहे. तुमच्याकडे कोणतं वाहन आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्या गाडीची कशी काळजी घेता, तुम्ही तिला कसं वागवता हे महत्त्वाचं आहे, असे सांगत इन्फ्लुएन्सरनं कॅप्शनमधून बंगळुरू रिक्षाचालकाच्या रिक्षाच्या आकर्षक लूकचं अगदी थोडक्यात वर्णन केलं आहे.

Story img Loader