आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही. असे अनेक लोक आहेत, जे त्यांच्या रोजच्या वापरातील वस्तुंचा जुगाड करतात आणि हे जुगाड यशस्वीदेखील असतात. इथे एकापेक्षा एक असे लोक आहेत, जे आपल्या डोक्याचा अतिवापर करतात आणि अशा गोष्टी तयार करतात की जग फक्त बघत राहतं; जे पाहून आपणदेखील त्यांचं कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की, जे पाहून मोठमोठे इंजिनियर्ससुद्धा विचारात पडतात. सध्या अशाच एका जुगाडचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही विचारात पडाल.
अनेक वेळा लोक आपल्या मेंदूचा वापर करून अशा युक्त्या तयार करतात की पाहणारा फक्त पाहतच राहतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वयंचलित मटका पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. उन्हाळ्यात अनेकजण माठातून पाणी पिणे पसंत करतात. माठातले थंडगार पाणी पिऊन तुमची तहान भागते. शिवाय निरोगी राहण्यासाठीही मदत मिळते. अलिकडे बाजारामध्ये नळ बसवलेले अनेक माठ येतात. पण नळ खराब होण्याचीही शक्यता जास्त असते. त्यामुळे एका व्यक्तीने भन्नाटच जुगाड लावला आहे. माठातून हाताने किंवा नळाच्या साहाय्याने पाणी काढण्याची झंझंटच दूर केली आहे. माठाला स्वयंचलित माठ बनवले आहे.
(हे ही वाचा : उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!)
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माठाला काही वायर जोडलेले दिसत आहेत आणि एक मोटर बसविलेली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही काचेच्या पाईपजवळ तुमचा ग्लास नेले तर माठातून पाणी आपोआप तुमच्या ग्लासात येईल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स हैराण झाले आहेत. याला आतापर्यंत हजारो लाइक्स मिळाले आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. “यात वापरण्यात येणारे साहित्य मटक्यापेक्षा महाग” असल्याचे, एका युजरने लिहिले आहे. अनेक युजर्सनी असेही लिहिले आहे की, “जर ते ऑटोमॅटिक असेल तर स्विच ऑन आणि ऑफ होण्याचा आवाज का येत आहे.” तथापि, बहुतेक वापरकर्त्यांना हा जुगाड खूप आवडला आहे. असो, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचे आहे? कृपया तुम्हीही कळवा…