Viral News Today: ग्रेटर नोएडामधील एका अपार्टमेंटच्या रहिवासी कल्याणकारी संघटनेने (RWA) रहिवाशांवर ड्रेस कोड लागू केला आहे. यापुढे सोसायटीच्या आवारात “लुंगी आणि नाईटी घालून फिरू नये” असे आवाहन केले आहे. हिमसागर सोसायटीच्या रहिवासी कल्याणकारी संघटनेने १० जून रोजी यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. “सोसायटीत वावरताना तुम्ही सर्वांनी तुमच्या वागण्यावर आणि पेहरावाकडे विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे जेणेकरून तुमच्या वागण्यावर कोणाचाही आक्षेप असणार नाही. तुमची मुले आणि मुलीही तुमच्याकडून शिकतात, त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की, लुंगी आणि नाईटी घालून फिरू नका, जे घरात घालायचे कपडे आहेत. ”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, आरडब्ल्यूएचे, सचिव हरी प्रकाश यांनी स्वाक्षरी केलेली नोटीस व्हायरल झाली असून सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ही नोटीस तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे यावर, अध्यक्ष सी के कालरा यांनी स्पष्ट केले की कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.

“आम्हाला काही महिलांकडून तक्रारी आल्या होत्या की लोक सोसायटीच्या कॅम्पसमध्ये लुंगी घालून बसतात, जे चांगले दिसत नाही. त्यामुळे एक दोन जणांशी थेट बोलण्यापेक्षा याबाबत परिपत्रक काढणे योग्य ठरेल, असे आम्हाला वाटले. ही फक्त विनंती होती, ड्रेस कोडसाठी कोणताही आदेश नव्हता. आम्ही विचारले की जर लोक असे कपडे टाळू शकत असतील तर हे सर्वांच्याच हिताचे ठरेल.”

मागील काही काळात नोएडा मधील अनेक इमारतींमध्ये धक्कादायक व किळसवाणे प्रकार समोर आले होते त्यांनतर आता या नव्या वादाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, आरडब्ल्यूएने नमूद केले आहे की ते रहिवाशांसाठी या संदर्भात स्पष्टीकरण जाहीर करणार आहे. कपड्यांची निवड करणे हा लोकांचा मूलभूत अधिकार आहे त्यानुसार ते हवे तसे कपडे निवडू शकतात.