Viral Video : हिवाळा आला की अनेक जण बर्फाळ प्रदेशात फिरायला जातात. या दिवसांमध्ये जम्मू काश्मीर, शिमला, अरुणाचल प्रदेश, मनाली इत्यादी थंड ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसून येते. या ठिकाणी बर्फाने गोठलेले तलाव एक विशेष आकर्षण असते. सध्या असाच एक अरुणाचल प्रदेशातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की गोठलेल्या तलावावर चालणे काही लोकांना चांगलेच महागात पडले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (avoid walking on frozen lake tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh watch video what happened next)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय घडले?

हा व्हायरल व्हिडीओ अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील आहे. येथे असलेल्या सेला तलावात ही भयानक घटना घडली आहे. या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गोठलेल्या तलावात चालण्याची हौस चार लोकांना चांगलीच महागात पडली. तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला आणि हे चार लोक तलावात अडकले. पुढे या लोकांनी आरडाओरड करणे सुरू केले तेव्हा इतर पर्यटकांनी त्यांना मदत केली आणि सुखरूप बाहेर काढले. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : रस्त्यावरून स्वस्तात मेकअप प्रोडक्टस् खरेदी करणाऱ्यांनो ‘हा’ VIDEO एकदा पाहाच; पुन्हा १० रुपयांची लिपस्टिक घेताना १०० वेळा कराल विचार

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “देव माफ करेल कर्म नाही” तरुणानं सापावर पेट्रोल टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक

frseven7_farhad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये गोठलेल्या तलावातून त्या लोकांना कसे बाहेर काढले, याविषयी सांगितले आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शिकलेले असताना सुद्धा अशा चुका का करतात?” तर एका युजरने लिहिलेय, “क्षणभराच्या आनंदासाठी जीव धोक्यात घालू नका” आणखी एका युजरने लिहिलेय, “लोक नियम का पाळत नाही.” अनेक युजर्सनी मदत करणाऱ्या पर्यटकांचे आभार मानले आहे. काही युजर्सनी गोठलेल्या तलावात अडकलेल्या पर्यटकांवर टीका सुद्धा केली आहे. पर्यटक नियम का पाळत नाही, असा सवाल सुद्धा उपस्थित केला आहे. यापूर्वी सुद्धा अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.