Viral Video: शाळेसंबंधित अनेक गोड आठवणी आपल्या स्मरणात असतात. शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं, खेळ नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी, खेळ नेहमीच आपल्या आठवणीत असतात. सध्या एका शाळेतील असाच एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेचे दिवस आठवतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्ली सोशल मीडियावर आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात कधी विद्यार्थी कवितेच्या तालावर नाचताना दिसतात, तर कधी खेळताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात वर्गातील विद्यार्थी आपल्या वर्ग शिक्षकांबरोबर कवितेच्या तालावर नाचताना दिसत आहेत.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील असून हा व्हिडीओ शाळेबाहेरच्या परिसरामध्ये शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेतील विद्यार्थी आपल्या सरांबरोबर “अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ”, या कवितेवर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी प्रत्येक जण जमेल तसा डान्स करताना दिसत आहेत; तसेच शिक्षकही ही कविता मुलांना डान्स करत करत छान प्रकारे शिकवताना दिसत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून, यावर एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करत आहेत.

हेही वाचा: ‘भूक कंट्रोल करता आली पाहिजे…’ तळ्यात मासा सापडला समजून बिबट्याने स्वतःची शेपूट पकडली अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून हसाल पोट धरून

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय की, “जिल्हा परिषद शाळा जिंदाबाद ”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप छान… आनंददायी शिक्षण”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “असे केल्याने मुले खूपच हुशार होतील सर”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “तुमच्यासारख्या शिक्षकांमुळे zp च्या शाळा आणखी तरी टिकून आहेत.”