भारतीय महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत हे पुन्हा एकदा २१ वर्षीय तरुणीने दाखवून दिले आहे. फार लहान वयात तिने असाध्य गोष्ट साध्य करून दाखवण्याचा ध्यास घेतला आहे, यात जर ती यशस्वी झाली तर आपल्या देशातली ती सगळ्यात तरूण महिला वैमानिक ठरेल. आएशा अझिझ या तरूणीला गेल्याच आठवड्यात विमान चालवण्याचा परवाना  मिळाला. या २१ वर्षीय तरूणीने मिग-२९ फायटर जेट उडवण्याचा ध्यास घेतला आहे. जर का तिचा प्रयत्न सफल झाला तर ती पहिली तरूण महिला वैमानिक ठरेल यात काहीच शंका नाही. आएशा १६ वर्षांची असताना तिचे या क्षेत्रात प्रशिक्षण सुरू झालं. या वयातील अनेक मुलं दहावीच्या परिक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी धडपडत असतात त्या वयात तिने या सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे टाकत यश मिळवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न, पण पैशांची अडचण

वाचा : देशातली पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची प्रेरणादायी कहाणी

बॉम्बे फ्लाईंग क्लबकडून तिला स्टुडंट पायलट लायसन्स देण्यात आले होते. २०१२ मध्ये तिने ‘नासा’मध्ये स्पेस ट्रेनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या आभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या तीन भारतीयांपैकी ती एक आहे ही विशेष कौतुकाची बाब. आंतराळवीर सुनिता विल्यम यांना ती आपला आदर्श मानते. तिला रशियाच्या सोकूल विमानतळावर मिग-२९ फायटर जेट उडवायचे आहे आणि यासाठी तिचे प्रयत्न सुरु आहे. एवढ्या कमी वयात कठीण गोष्ट साध्य करून तिने भारताच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा खोवला हे नक्की.

वाचा : महामार्गावरील दारुबंदीसाठी लढणाऱ्या लढवय्याची कहाणी