Ayodhya After Deepotsav: अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर २२ लाख दिव्यांची आरास केल्याचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. दीपोत्सवाच्या सातव्या वर्षी अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर २२ लाखांहून अधिक मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. मागील वर्षीच्या तुलनेत ६. ४७ लाख अधिक दिवे नदीकाठी प्रज्वलित करण्यात आले होते. नदीकाठच्या ‘राम की पायडी’च्या ५१ घाटांवर २५,००० स्वयंसेवकांच्या हस्ते हे काम करण्यात आले होते. यंदाच्या रेकॉर्ड्ससह अयोध्येतील दीपोत्सवाचा मागील वर्षीचा रेकॉर्ड मोडलेला आहे. मात्र या नयनरम्य दृश्याची अत्यंत हृदयद्रावक स्थिती आता चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात काही मुले घाटावरील दिव्यांमधून तेल काढून भांड्यात भरताना दिसत आहेत. “दिव्यत्वात दारिद्र्य… जिथे गरिबी दिव्यातून तेल काढायला भाग पाडते तिथे उत्सवाचा प्रकाश मंदावतो. आमची एवढीच इच्छा आहे की असा सण व्हावा की, ज्यात केवळ घाटच नाही तर प्रत्येक गरिबांचे घर उजळून जावे.” असे कॅप्शन लिहीत अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे ही वाचा<<पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गरबा डान्स पाहिलात का? ‘या’ व्यक्ती मुळे होतोय पाहणाऱ्यांचा गोंधळ, खरं आलं समोर

दरम्यान, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी ड्रोन वापरून दिव्यांची मोजणी केल्यावर यंदाचा अयोध्यातील दीपोत्सवाची जागतिक विक्रम म्हणून नोंद केली आहे. योगी आदित्यनाथ यांना प्रातिनिधिक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र सुपूर्त करताना अयोध्या ‘जय श्री राम’च्या जयघोषाने दुमदुमली होती. या कार्यक्रमाला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि भारतातील ४१ देशांच्या दूतावासातील प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya deepotsav video children taking oil from 22 lakhs diya lighten at ram ki payde emotional post by akhilesh yadav svs