अंकिता देशकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Ayodhya Five Star Bus For Devotees: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. या पोस्ट मध्ये सांगितले होते की, एक तीन मजली, ५-स्टार सुविधा असलेली बससेवा अयोध्येमध्ये सुरु होणार आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी अयोध्या एअरपोर्ट ते राम जन्मभूमी असा प्रवास करण्याची सोय या बसच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे समजतेय. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या चर्चांदरम्यान भाविक व प्रवाशांसाठी ही बातमी साहजिकच मत्त्वाची व आनंदाची आहे पण यात नेमकं किती तथ्य आहे हे लाईटहाऊस जर्नालिझमने शोधून काढले आहे.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर विशाल सिंह क्षत्रिय यांनी हि पोस्ट शेअर केली.

पोस्ट काय सांगते: अयोध्या श्री रामजन्मभूमीला भेट देण्यासाठी, अयोध्या विमानतळ ते जन्मभूमी अशी तयार केलेली ही 3 मजली पूर्ण वातानुकूलित 5 स्टार बस काही दिवसात अयोध्या धामच्या भूमीवर पर्यटकांसाठी येत आहे! हि बस चेन्नई मध्ये बनवण्यात येत आहे.

बाकी यूजर्स देखील हि पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आमचा तपास प्राथमिक स्तरावर आम्ही या चित्राला निरखून बघण्यापासून सुरु झाला . आम्हाला त्यात, ‘@inspiringdesignsnet’ असे वॉटरमार्क सापडले.त्यानंतर आम्ही या वॉटरमार्कचा शोध इंस्टाग्राम वर घेलता. आम्हाला व्हायरल होत असलेला फोटो या पेज वर सापडला

यात कुठेच हि बस अयोध्येत वापरली जाणार असल्याचे नमूद केले नव्हते.

या पोस्ट चे कॅप्शन होते: Just don’t drive under any bridges. सोशल नेटवर्किंग वेबसाइट आणि विविध वेबसाइटस वर आम्हाला हे फोटो सापडले, परंतु अयोध्येत हि बस वापरली जाणार असल्याचा कुठेही उल्लेख नव्हता.

https://americasbestpics.com/picture/ok-fine-ll-go-camping-2KLEsJubA

पुढील स्टेपवर आम्ही जनरेटिव्ह एआय आयडेंटिफायरमध्ये इमेज अपलोड केली.

आम्ही ‘Optic AI or Not’ यावर फोटोची पडताळणी केली असता हा फोटो AI वापरून तयार केला गेला आहे.

नंतर आम्ही ते Maybe’s AI Art Detector वर सुद्धा तपासून पाहिले यातही फोटो कृत्रिमरित्या तयार केल्याचे लक्षात आले.

बातम्यांमध्ये सुद्धा ही बस श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रासाठी मध्ये उपलब्ध होणार असल्याची कोणतीही माहिती आम्हाला मिळाली नाही.

हे ही वाचा<< नरेंद्र मोदींचा मुसलमानांच्या गोल टोपीतील लुक; इजिप्तची मशिद नव्हे तर मुंबईतील आहे फोटो, फरक इतकाच की…

पुढच्या टप्प्यात आम्ही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे ट्रस्टने डॉ अनिल मिश्रा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही आम्हाला सांगितले की अशा कोणत्याही घडामोडीबद्दल त्यांना माहिती नाही.

आम्ही Interesting Designs या इंस्टाग्राम पेज ला देखील संपर्क केला. त्यांनी सांगितले कि हे चित्र त्यांनीच बनवले आहेत आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) चा वापर करून बनवले गेले आहे. 

निष्कर्ष: विमानतळावरून अयोध्या यात्रेकरूंसाठी वापरल्या जाणार्‍या 3 मजली बसचा व्हायरल फोटो AI वापरून तयार केलेला आहे, व्हायरल दावा खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya ram bhakta to get 3 tier ac five star bus after ram mandir open viral post based on false reality check facts svs