Ayodhya Ram Mandir Bells Viral Video: लाईटहाऊस जर्नालिझमला एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात असल्याचे आढळले. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या प्रचंड मोठया घंटा ‘BHEL’ त्रिचीने बनवल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण याचा नीट तपास केल्यावर घंटा बनवणाऱ्या कंपनीबाबत एक मोठा उलगडा झाला आहे. नेमकं हे प्रकरण काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Satpal Jinagal ने व्हायरल दाव्यासह व्हिडिओ शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून तपास सुरू केला. आम्हाला त्यातून अनेक कीफ्रेम्स मिळाल्या आणि मग आम्ही प्रत्येक फ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केला. यामुळे आम्हाला एक X सापडले ज्यात नमूद केले आहे की, घंटा नमक्कल जिल्ह्यात तयार केल्या गेल्या आहेत विशेष पूजा करण्यासाठी पाठवल्या गेल्या आहेत.
आम्हाला पत्रिकेवरील एक रिपोर्ट देखील सापडला. तामिळनाडूतून घंटागाडी निघाल्याचाही अहवालात उल्लेख आहे.
आम्हाला द हिंदूवरही यासंबंधीचा रिपोर्ट देखील आढळला.
रिपोर्ट मध्ये सांगितले आहे: अंडाल मोल्डिंग वर्क्सचे मालक आर. राजेंद्रन (६६), म्हणाले की त्यांचे कुटुंब गेल्या सात पिढ्यांपासून या व्यवसायात आहे. प्रसाद यांना आमच्या कामाची माहिती मिळाली आणि त्यांनी चेन्नईतील एका व्यापाऱ्यामार्फत आमच्याशी संपर्क साधला. प्रसाद यांना राममंदिर प्रशासनाकडून मंदिरासाठी घंटा पुरवण्याचा आदेश मिळाला, असे ते म्हणाले.
आम्हाला ऑर्गनाईजर वेबसाइटवर एक रिपोर्ट देखील सापडला, ज्यात उल्लेख केला आहे की बंगळुरू येथील भक्त राजेंद्र प्रसाद यांनी नमक्कल येथील मोहनूर रोडवरील अंडल मोल्डिंग वर्क्समधून ४८ घंटा तयार करण्याचे काम केले.
या घंटा BHEL त्रिचीने बनवल्याचा उल्लेख अहवालात नाही.
आम्ही ईमेलद्वारे BHEL शी देखील संपर्क साधला आहे, प्रतिसाद मिळाल्यावर फॅक्ट चेक अपडेट करण्यात येईल.
हे ही वाचा<< गायी वाहून नेणारं भारतीय मालवाहू जहाज हुथींच्या ताब्यात? कत्तलीसाठी नेत असल्याचा गंभीर दावा, खरं काय?
निष्कर्ष: अयोध्या राममंदिरासाठी प्रचंड घंटा ‘भेल’ त्रिचीने बनवली नाही. नमक्कल येथील अंदल मोल्डिंग वर्क्सने या घंटा तयार केल्या आहेत.