अंकिता देशकर
Ayodhya Ram Mandir Temple First Look: लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडिओ दिसून आला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असा दावा करण्यात आला होता की हा व्हिडिओ अयोध्या राम मंदिराचे दृश्य आहे. राम मंदिराची झलक असल्याचे सांगणारा हा व्हिडीओ साहजिकच अल्पावधीत व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे मूळ अयोध्येत नसून चक्क नागपूर मध्ये असल्याचे लक्षात येतेय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर, Pranad Kumar Bhanjadeo ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
व्हिडिओ पाहून आम्ही आमचा तपास सुरू केला. व्हिडिओमध्ये ‘Nagpur Experience’ असा वॉटरमार्क होता. आम्हाला Nagpur Experience चा युट्युब चॅनेल देखील सापडला.
त्यानंतर आम्ही वापरकर्त्याने पोस्ट केलेले व्हिडिओ तपासले. आम्हाला नागपूरबद्दल वापरकर्त्याने पोस्ट केलेले विविध व्हिडिओ आढळले. आम्हाला त्याच्या प्रोफाइलवर YouTube शॉर्ट म्हणून पोस्ट केलेला व्हायरल व्हिडिओ आढळला. कॅप्शनमध्ये म्हटले आहे: श्री राम धाम || कोराडी नागपूर राम मंदिर
आम्हाला त्याचा तपशीलवार व्हिडिओ देखील सापडला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे: कोराडी राम मंदिर नागपूर
नागपूर टुडे वर प्रकाशित अहवालात नमूद केले आहे की, या सांस्कृतिक केंद्राचे दोन मजले आहेत आणि पहिला मजला ‘रामायण दर्शनम हॉल’ आहे ज्यात वालिमिकी रामायणच्या महत्त्वपूर्ण भागांवर १२० फोटो प्रदर्शित केले आहेत.
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र टोकेकर यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी हा व्हिडिओ कोराडीचा असल्याची पुष्टी केली.
त्यानंतर आम्ही श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे प्रकल्प व्यवस्थापक किशोर हजारे यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी पुष्टी केली की सदर व्हिडिओ भवन सांस्कृतिक केंद्र, नागपूरजवळील कोराडीचा आहे, ज्याला रामधाम किंवा रामायण केंद्र म्हणूनही ओळखले जाते.
निष्कर्ष: भवन सांस्कृतिक केंद्राचा व्हिडिओ, नागपूरजवळील कोराडी, राम मंदिर, अयोध्येचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेला.