Ayodhya Ram Mandir : येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन आहे. त्यानिमित्त फक्त अयोद्धते नाही तर देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.राम फक्त राम मंदिराच्या खूप उद्धाटनासाठी उत्सूक असल्याचे दिसून येत आहे. राम मंदिर कसे असेल, या मंदिराची रचना कशी असेल, याविषयी प्रत्येकाला कुतूहूल आहे.राम मंदिराचे नवनवीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये राम मंदिरात सोन्याचे दरवाजे बसवलेले दिसत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की हे सोन्याचे दरवाजे राम मंदिराच्या गर्भगृहाजवळ बसवले आहे. या दरवाज्याला गर्भगृहाचे दरवाजे संबोधले जात आहे. या दरवाज्याची उंची ८ फूट असून रुंदी १२ फूट आहे. या दरवाज्यावर कोरीव नक्षीकाम केले आहेत. याला नागर शैली म्हणतात. यावर कमळ, हत्ती, मोर, तसेच अन्य कलाकृती साकारल्या आहेत. राम मंदिरात एकूण ४४ दरवाजे लावण्यात येणार आहे. त्यापैकी १४ सोन्याचे दरवाजे बसवले आहे.उद्घाटनापूर्वी सर्व दरवाजे लावण्यात येईल.
Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra या एक्स अकाउंटवरुन राम मंदिराविषयी अधिकृत माहिती दिली जाते. आता त्यांनी या सोन्याच्या दरवाज्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भगवान श्री रामाच्या गर्भगृहात सोन्याचा मुलामा चढवलेला दरवाजा बसवल्यानंतर आता तळमजल्यावर सर्व १४ सोन्याचा मुलामा चढवलेले दरवाजे बसवण्याचे काम पूर्ण झाले.” या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक राम भक्तांनी ‘जय श्री राम’ लिहिलेय.
२२ जानेवारीला औपचारिकरित्या धार्मिक पूजा आणि विधी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या ऐतिहासिक क्षणाची सर्वांना ओढ लागली आहे. या दिवशी संपूर्ण अयोद्धेत दिवा लावून दिवाळी साजरी केली जाणार आहे. याशिवाय जे लोक अयोद्धेत येऊ शकणार नाही ते सुद्धा त्यांच्या घरी दिवे लावून दिवाळी साजरी करणार आहे.