1100 kg Diya For Lord Ram : सध्या देशात राम मंदिराची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहे. यावेळी प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अयोद्धेत जोरदार तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर राम मंदिरातील आणि त्या संबंधीत फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रामललासाठी ११०० किलोचा दिवा बनवलेला दिसत आहे. हा खास दिवा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या दिव्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
१०० हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी देशात वाद सुरू होता, तो आता संपुष्टात आला असून राम मंदिराच्या उद्घाटनाने एक नवी सुरुवात दिसून येईल. या उद्घाटनासाठी अनेक जण उत्सूक आहेत. अनेक लोक त्या दिवशी अयोद्धेत आणि आपआपल्या घरी दिवे लावून दिवाळी साजरी करणार आहे. देशभरात अनेक ठिकाणी त्या दिवशी जल्लोष साजरा केला जाणार आहे. रामभक्त अनेक प्रकारे हा दिवस साजरा करताना दिसून येणार आहे. अशातच वडोदराचे रामभक्त अरविंदभाई पटेल यांनी रामललासाठी ११०० किलोचा दिवा बनवला आहे.
हा दिवा राम मंदिरात ठेवला जाणार आहे. याबाबत मंजूरी मिळताच हा दिवा अयोद्धेत आणला जाईल. यापूर्वी प्रभू श्रीरामासाठी १०८ फुटांची अगरबत्ती बनवली आहे. याबाबत अरविंदभाई पटेल यांनी ऐकले होते तेव्हा त्यांच्या डोक्यात भव्य दिवा बनवण्याचा विचार आला आणि त्यांनी तब्बल ११००० किलोचा दिवा बनवला आहे. ५०१ किलोचे तूप टाकून हा दिवा प्रज्वलित केला जाणार आहे.
kulinmistry या एक्स अकाउंटवरुन या दिव्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भारतात बनविलेला अयोद्धेतील राम मंदिरासाठी सर्वात मोठा दिवा, ११०० किलोचा दिवा ज्यामध्ये ५०१ किलोचे तूप टाकले जाईल. हा दिवा अरविंदभाई पटेल यांनी बनवला आहे.” फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे, हा दिवा अत्यंत आकर्षक आणि मनमोहक दिसत आहे. सध्या या दिव्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.