Ayodhya Ram Mandir Indian Community hold Car Rally in france : अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामुळे केवळ भारतातच नाही, तर जगभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषत: जगभरातील अनेक रामभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद, उत्साह दिसून येत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, नेपाळसह जगभरातील अनेक देशांमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जात आहे. त्यात आता फ्रान्समधूनही रामभक्तांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. येथे राभक्तांनी टेम्पो अन् कारमधून भव्य रॅली काढली.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, श्रीरामाचे बॅनर अन् फुलांनी सजवलेल्या टेम्पोमध्ये रामभक्त उभे राहून श्रीरामाचा जयजयकार करीत आहेत. यावेळी फ्रान्सच्या रस्त्यांवरही अनेक भारतीय हातात श्रीरामाच्या घोषणांचे झेंडे घेऊन रॅलीत सहभागी झाले आहेत. कडाक्याच्या थंडीतही लोक स्वेटर, कॅप घालून रॅलीचा आनंद घेत आहेत. यावेळी एकामागोमाग एक अशा उभ्या असलेल्या प्रत्येक कारवर भगवा झेंडा दिसत आहे.
पंतप्रधान मोदींनी हेलिकॉप्टरमधून टिपला अयोध्येतील अद्भूत नजारा; पाहा VIDEO
अशा प्रकारे फ्रान्समधील भारतीय समुदायाने भव्य कार रॅली काढून राम मंदिरातील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी मोठ्यांसह अनेक लहानही या रॅलीत सहभागी झाल्याचे दिसले.
अमेरिकेत उत्साहाचे वातावरण
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अमेरिकेतही जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतेय. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या परिसरात अयोध्येप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, आज अनेक भारतीयांनी हातात भगवे झेंडे घेत रामाचा जयजयकार केला काही. लोकांच्या वाहनांवरही हे झेंडे लावले होते. विश्व हिंदू परिषदेच्या यूएस शाखेने टेक्सास, इलिनॉय, न्यूयॉर्क, न्यू जर्सी व जॉर्जियासह १० राज्यांमध्ये ४० हून अधिक होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. सेशेल्समधील स्वामीनारायण मंदिरात लोकांनी दिवे लावून, ढोल-ताशांच्या गजरात नाचत आनंद साजरा केला.