Ayodhya Ram Mandir Opening Ceremony Viral Video: अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास उरले आहेत. रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करून राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लाखो भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. देशातील आणि जगातील तमाम रामभक्त या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावरही लोक प्रभू राम आणि राम मंदिराशी संबंधित पोस्ट सतत शेअर करीत आनंद साजरा करीत आहेत. त्यात ट्रेनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावरील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा! प्रवाशांचा जबरदस्त डान्स (Ayodhya Ram Mandir Inauguration)

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ट्रेनमधील प्रवाशांमध्येही मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रवासी चक्क ट्रेनमध्येच ‘भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा’ हे गाणे वाजवून नाचू लागले. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. रामभक्तीत तल्लीन होत टाळ्या वाजवीत हे प्रवासी नाचत होते . यावेळी ट्रेनमधील काही प्रवाशांनी हा क्षण रेकॉर्ड केला आणि पोस्ट केला; जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्या,न एक्सवर (पूर्वीचे ट्विटर)@desimojito नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले- लोकांचा आनंद कोणत्याही सीमेपलीकडे आहे. दुसर्‍या युजरने लिहिले- हा भारतासाठी मोठा दिवस आहे. कोण म्हणते की, आम्ही कलियुगात राहतो. आणखी एका युजरने लिहिले- माझ्याकडे या उत्साहाचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. बंधू आणि भगिनींनो, जय श्रीराम, मीदेखील या ट्रेनमध्ये असतो तर…