Ram Mandir : आज २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या निमित्त्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण देश दिवाळी साजरी करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी दिवे लावून उत्सव साजरा केला जात आहे.अशातच अयोध्येतील एका महाविद्यालयात चक्क दिव्यांपासून श्रीरामाची प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेसाठी १४ लाख दिव्यांचा वापर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ अयोध्येतील एका महाविद्यालयातील आहे. मोठ्या मैदानावर काही स्त्रिया दिवे लावताना दिसत आहे. योग्य पद्धतीने आणि क्रमवार दिवे लावताना त्या दिसत आहे. असंख्य दिव्यांच्या मदतीने ते प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारताना दिसत आहे. सुरुवातीला व्हिडीओत तुम्हाला प्रभू रामाची प्रतिमा दिसणार नाहीत पण नंतर सुंदर रामाची प्रतिमा साकारलेली दिसते. या श्रीरामाच्या प्रतिमेमध्ये अनेक रंगाचे दिवे वापरले आहेत. श्रीरामाचे शरीर निळ्या रंगाचे दाखवण्यासाठी निळा रंगाचे दिवे, त्यांच्या वस्त्रांसाठी गुलाबी आणि पिवळा रंगाचे दिवे वापरले आहे. याशिवाय त्यांच्या पायाखाली दिव्यांपासून काम मंदिर सुद्धा साकारले आहे. आणि खाली ‘जय श्री राम’ असे मोठ्या अक्षरात लिहिलेय. या प्रतिमेत श्रीराम धनुष्यबाण चालवताना दिसताहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “साकेत महाविद्यालय अयोध्या. १४ लाख दिव्यांपासून बनवली प्रभू श्रीरामाची प्रतिमा”

हेही वाचा : Ram Mandir In Maharastra : राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ प्रसिद्ध राम मंदिराला द्या भेट, ‘या’ खास जागेचा रामायणात आहे उल्लेख

ayodhyase या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर, जय श्री राम” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही एक सुंदर कला आहे” अनेक युजर्सनी व्हिडीओवर ‘जय श्री राम’चा जयघोष केला आहे. काही युजर्सनी व्हिडीओवर हार्टेचे इमोजी शेअर केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya ram mandir people creat portrait image of shreeram from 14 lakhs diyas video goes viral on social media ndj
Show comments