Ayodhya ram mandir pran pratistha : कोट्यावधी राम भक्तांचे स्वप्न असेले राम मंदिराचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. अयोध्येत श्री रामाचे भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग आला आहे. येत्या २२ जानेवारी २०२४ ला या मंदिरात श्री रामाचे बाल रूप रामलालाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जसजशी तारीख जवळ येत आहे, तसतसे येथे काम करणारे कामगार अधिक जोमाने आणि उत्साहाने काम पूर्ण करत आहेत.राम मंदिरासाठी काम करणं हे आमचं सौभाग्य असल्याच्या भावना यावेळी या मजुरांनी बोलून दाखवल्या आहेत. या मजूरांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सात पिढ्यांचे चांगले कर्म आहे की आम्ही इथे काम करायला आलो

मंदिरासाठी काम करणारे कामगार म्हणतात “जे काही घडत आहे ते चांगलेच घडत आहे. जगातील सर्वात भव्य मंदिर येथे बांधले जाणार आहे. आमच्या सात पिढ्यांचे चांगले कर्म आहे की आम्ही इथे काम करायला आलो, नाहीतर आम्हाला ही संधी मिळेल असं कधी वाटलं नव्हतं.

‘पैशासाठी नाही तर देवाच्या सेवेसाठी काम करतो’

एका मजुराने सांगितले की, “केवळ नशीबवान लोकांनाच येथे येण्याची संधी मिळते. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही दोन वर्षांपासून येथे देवाच्या सेवेत व्यस्त आहोत आणि आम्हाला येथे काम करण्याची संधी मिळाली आहे.” बहुतेक कामगार म्हणाले की “ते इथे पैशासाठी काम करत नाहीत. ते फक्त भगवान रामाची सेवा करण्यासाठी येथे आले आहेत. तुम्हाला खूप पैसे मिळतील, पण इथे तुम्हाला जो मान मिळेल तो इतरत्र कुठेही मिळणार नाही.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘शिकार करो या शिकार बनो’ मगरीने केला चित्त्याचा मोठा गेम; मगरीनं असं काय केलं? पाहा Video

‘कुटुंबातील सदस्यांनाही अभिमान वाटतो’

आणखी एका मजुरानं सांगितलं की, “आम्ही दोन वर्षांपासून येथे काम करत आहोत. देवासाठी काम करण्याची संधी मिळाल्याने खूप छान वाटते. आम्ही या मंदिरासाठी काम करतोय हे अकून घरच्यांनाही बरं वाटतं. प्रभू राम मंदिराच्या उभारणीत आमचा हातभार असेल याची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya ram mandir pran pratistha ceremony date temple labour speak first time video viral on social media srk