Ayodhya Ram Mandir Prasad : सोमवारी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. त्यासाठी देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. प्राण-प्रतिष्ठपणा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्या दरम्यान, प्रभू राम बाळ रुपातीलच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा आणि पुजा यावेळी करण्यात आली. हा अभूतपूर्व क्षण पाहाण्यासाठी जगभरातील भाविक आतूर झाले होते. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक सेलब्रिटी, नेते, कलाकार, खेळाडू मान्यवर आणि सामान्य नागरिकांना अयोध्या नगरीत दाखल झाले होते.
अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. पूर्ण देश राममय झाला आहे. अयोध्याही प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त सजली आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० च्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. दुपारी ११ ते १ च्या दरम्यान अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य विधी पार पडले दुपारी १ च्या सुमारास मोदी राम मंदिर सोहळ्यात सहभागी झाले. ४० मिनिटांचा हा सोहळा दुपारी१२:२० वाजता सुरू झाला. हा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार सारा देश झाला आहे. घरबसल्या अनेकांनी रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठाचा सोहळा पाहिला. देशाच्या विविध क्षेत्रातील ७ हजारांहून अधिक लोक अयोध्येत दाखल झाले होते. दरम्यान उपस्थित भाविकांना अयोध्या राम मंदिर प्रसाद बॉक्सही देण्यात आला, ज्यामध्ये सात पदार्थ होते.
प्रसाद बॉक्समध्ये कोणते सात पदार्थ होते? (WHAT ARE THE SEVEN ITEMS IN THE PRASAD BOX?)
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्या राम मंदिराच्या प्रसाद बॉक्समध्ये सात पदार्थांचा समावेश केला आहे
- बटाट्याचे चीप्स
- राजगीरा लाडू
- तिलगुळ रेवडी
- काजू
- बदाम
- मनुका
- मखानाॉ
सोशल मीडियावर मंदिराच्या प्रसाद बॉक्सचे फोटो व्हायरल होत आहे.