Ram Mandir : येत्या २२ तारखेला राम मदिरांचा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहे. यावेळी प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियावर राम मंदिरासंदर्भात अनेक नवनवीन फोटो शेअर समोर येत आहे. २२ तारखेला होऊ घातलेल्या उद्घाटन सोहळ्याचा उत्सव १६ जानेवारीपासून सुरू झाला आहे. १६ जानेवारीला प्रायश्चित आणि कर्मकुटी पूजन पार पडले तर १७ जानेवारीला मोठी भव्य जलयात्रा निघाली होती.प्रभू रामलल्लांच्या मूर्तीसह शोभायात्रा काढण्यात आली होती. या रामलल्लांच्या मूर्तीने मंदिराच्या परिसरात प्रवेश केला आहेत. आज १८ जानेवारी दुपारी १.२० मिनिटांनी रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात बसवली जाणार आहेत.
ShriRamTeerth या एक्स अकाउंटवरुन राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनी रामलल्लांची मूर्तीचे फोटो शेअर केले आहेत. ही मूर्ती अतिशय आकर्षक आहे. या मूर्तीला पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या रामलल्लांच्या मूर्तीने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. कपाळावर टिळा, डोक्यावर सुंदर आणि आकर्षक मुकूट, गळ्यात मोत्यांची माळ दिसत आहे. या रामलल्लांच्या मूर्तीवर एक अनोखे तेज दिसत आहे.रामलल्लांच्या मूर्तीसाठी मंदिराच्या गाभाऱ्यात खास सिंहासन बनवण्यात आले आहे. ३.४ फूट उंचीचे हे सिंहासन मकराना दगडापासून बनवलेले आहे.
आज दुपारी १.२० मिनिटांनी रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात बसवली जाणार असल्याची माहिती सुद्धा राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनी सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे. मंदिरासंदर्भातील लहान मोठी माहिती ते या अकाउंटवरुन शेअर करत असतात.
हेही वाचा : “रामाच्या नावावर जे आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत ते..”, धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य चर्चेत
१०० हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी वाद सुरू होता तो आता संपुष्टात आला असून राम मंदिराच्या उद्घाटनामुळे एक नवीन सुरुवात होणार आहे. या उद्घाटनासाठी देशभरातील लाखो भक्त उत्सूक आहेत. अयोध्या आणि देशभरात या दिवशी दिवे लावून दिवाळी साजरी केली जाणार आहे. एवढंच काय तर राम मंदिराच्या उद्घाटनावरुन इतर देशात राहणारे भारतीय सुद्धा त्या त्या देशात जल्लोष साजरा करताना दिसत आहे.