Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामाचा अभिषेक होणार आहे. देशभरातील लोकांमध्ये या निमित्ताने उत्सवाचे वातावरण आहे. कारण शेकडो वर्षानंतर राम मंदिर अयोध्येत होत आहे. राम मंदिराची भव्यता पाहण्यासारखी आहे. राम मंदिर बनवण्यासाठी विशेष कलाकारांची मदत घेतली गेली आहे. राम मंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.तुमच्याबरोबरच देशभरातील लोकांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता आहे. प्रभू रामाच्या कार्यात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वतःला श्री राम मंदिराशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान अशाच एका एका भाविकाने चक्क बिस्किटाने राम मंदिर साकारले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पश्चिम बंगालच्या एका तरुणाने पार्ले-जी बिस्कीटांपासून राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण पार्लेजी बिस्कीटांपासून मंदीर बनवताना दिसत आहे.बिस्किटांपासून राम मंदिराची प्रतिकृती बनवणाऱ्या या तरुणाचं नाव छोटन घोष असं आहे. चार बाय चार फूटची ही प्रतिकृती बनवण्यासाठी त्याने २० किलो पार्ले-जी बिस्किटांचा वापर केला आहे. तर हे मंदिर बनवण्यासाठी त्याला पाच दिवस लागले. या प्रतिकृतीमध्ये बिस्किटांसोबतच थर्माकोल, प्लायवूड आणि डिंकाचा वापर केला आहे. ही प्रतिकृती इतकी सुंदर बनवली आहे की त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
याआधीही काही रामभक्तांनी श्री राम मंदिरासाठी रांगोळी, पेंटिंग, खास पदार्थ, साडी, अगरबत्ती आदी गोष्टी त्यांच्यासाठी मनोभावे बनवताना दिसून आले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> OMG! ओडीशामध्ये मानवी वस्तीत घुसलेल्या हत्तीचा धुमाकूळ; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
मंदिराची विशेषता काय?
राम मंदिराच्या बांधकामात कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. यामध्ये चारही बाजुंना चार मंदिरे आहेत. मंदिर परिसरात सूर्यदेवाचे मंदिर, देवी भगवतीचे मंदिर, भगवान गणेशाचे मंदिर आणि भगवान शिवाचे मंदिर बनवण्यात आले आहे. मंदिराजवळ प्राचीन सीता विहीर देखील आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे मंदिराच्या बांधकामात कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही.