Ayodhya Ram Mandir Floods Video : महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काही राज्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्याने भरलेल्या रस्त्यातून वाट काढत जावे लागतेय. अशात लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पूरस्थितीशी संबंधित व्हिडीओचे दोन भाग व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामध्ये पुरामुळे रस्ते, महामार्ग, भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतरचा असल्याचा दावा केला जात आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारल्यामुळे पावसात तिथे भीषण पूरस्थिती उदभवल्याचा दावाही केला जात आहे. त्यामुळे आम्ही हा दोन भागांतील हा व्हायरल व्हिडीओ अयोध्येतील पावसासंबंधीचा आहे का? याचा तपास केला, त्यावेळी तपासात एक वेगळेच सत्य समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर M R S New ने आपल्या प्रोफाइलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

या व्हिडीओचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात पूरग्रस्त महामार्ग आणि दुसऱ्या भागात पूरग्रस्त भुयारी मार्ग दाखविण्यात आला आहे.

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि अनेक कीफ्रेम काढून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही कीफ्रेमवर रिव्हर्स इमेजसंबंधीचा शोध सुरू केला.

More Fact Check Stories : मुंबईत रुळांवरून लोकल ट्रेन थेट चढली प्लॅटफॉर्मवर अन् लोकांनी मारल्या उड्या…; अपघाताच्या थरारक घटनेचा Video कधीचा? वाचा सत्य घटना

रिव्हर्स इमेज सर्चदरम्यान आम्हाला Md Alamgir या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

हा व्हिडीओ २१ एप्रिल २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आम्हाला या व्हायरल व्हिडीओची एक कीफ्रेमदेखील सापडली आहे. यावेळी व्हिडिओमध्ये नमूद केलेले ठिकाण दुबईचे असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर आम्ही व्हिडीओचा दुसरा भाग पाहिला असता, त्यामध्ये लोक बोगद्यामध्ये पुराच्या पाण्यातून वावरताना दिसले.

आम्हाला व्हिडीओचा दुसरा भाग बाबा बुटा नावाच्या फेसबुक पेजवर सापडला. ‘Dubai after rain’ असे या व्हिडीओचे शीर्षक होते.

आम्हाला अयोध्या पोलिसांची पोस्टदेखील आम्हाला आढळली, ज्यामध्ये हा व्हिडीओ बनावट असल्याचे सांगण्यात आले होते. या पोस्टमध्ये लिहिले होते, “#AyodhyaPolice ठरावीक ट्विटर हॅण्डल आणि सोशल मीडियावर पसरलेल्या खोट्या बातम्यांचे खंडन करते. ट्वीटमध्ये दाखविण्यात आलेला व्हिडीओ अयोध्येचा नाही. दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निष्कर्ष :

राम मंदिराच्या बांधकामानंतर अयोध्येत पूर आल्याचे सांगून, दुबईतील पुराचा व्हिडीओ शेअर केला जात आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत. तपासादरम्यान आम्हाला कळले की, हा व्हिडीओ अयोध्येचा नसून, दुबईतील पुराचा आहे. एकंदरीत व्हायरल केला जाणारा दावा खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhyas ram path waterlogged after heavy rain flood affected highway and subway ayodhya after build ram mandir sjr