Ayres Sasaki Death : संगीत जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. एका लोकप्रिय गायकाने तरुण वयात जगाला अखेरचा निरोप दिला आहे. ब्राझीलमधील प्रसिद्ध गायक आयरेस सासाकी याचा लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अपघाती मृत्यू झाला आहे. आयरेस सासाकी हा ब्राझीलसह जगभरात लाईव्ह कॉन्सर्ट करायचा. तो ब्राझीलमध्ये खूप लोकप्रिय आहेच, त्याशिवाय जगभरातील संगीत जगतात त्याने स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्याची लाईव्ह कॉन्सर्ट पाहायला हजारो लोक यायचे. सासाकीचा मृत्यू देखील लाईव्ह कॉन्सर्टमधील अपघातामुळे झाला आहे. सासाकीने लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्याला मिठी मारली आणि तो देखील भिजला. त्यानंतर एका विद्युतवाहिनीला त्याचा स्पर्श झाला. त्यामुळे वीजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला आहे. अवघ्या ३५ व्या वर्षी आयरेसने या जगाचा निरोप घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही महिन्यांपूर्वी आयरेसचं लग्न झालं होतं. आयरेसच्या या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. रडून-रडून तिची प्रकृती ढासळली आहे. आयरेस सॅलिनोपोलीमधील सोलर हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गात असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला.

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आयरेस सासाकीचं गाणं ऐकण्यासाठी त्याचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. त्याच वेळी एक पाण्याने भिजलेला चाहता सासाकीला भेटण्यासाठी त्याच्या जवळ गेला. सासकीनेही त्याच्या चाहत्याला निराश न करता त्याला मिठी मारली. त्यामुळे सासाकीचे कपडे देखील भिजले. त्याचवेळी एका केबलमुळे (वीजेची तार) त्याला वीजेचा धक्का लागला आणि आयरेसने मंचावरच प्राण सोडले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा चाहता पाण्यात भिजून का आला होता? याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

हे ही वाचा >> Video: चालताना फोनवर बोलणाऱ्या वृद्धाचा मोबाईल चोरट्यानं हिसकावला, रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत मत्यू; CCTV फूटेज व्हायरल!

पोलीस तपास सुरू

आयरेस सासाकीच्या काकी या लॉईव्ह कॉन्सर्टला उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, “आयरेसचा कार्यक्रम निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ चालला. कॉन्सर्टच्यावेळी आयरेलबरोबर जे लोक उपस्थित होते आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून हे सगळं कशामुळे घडलं ते आम्हाला समजू शकेल. पोलिसांसह आम्ही देखील सर्व प्रकारची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत.” दरम्यान, पोलिसांनी काही प्रत्यक्षदर्शींकडे या घटनेची चौकशी केली आहे. दुसऱ्या बाजूला, सोलर हॉटेलने म्हटलं आहे की आम्ही या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना सर्व प्रकारची मदत करू.

हे ही वाचा >> दारुचा ट्रक रस्त्यावर पलटी; जखमींना सोडून लोकांचा मात्र दारुवर डल्ला, संतापजनक Video होतोय व्हायरल

आयरेसच्या पत्नीला मोठा धक्का

आयरेस सासाकीने ११ महिन्यांपूर्वी त्याची प्रेयसी मारियाना हिच्याशी लग्न केलं होतं. आयरेसच्या या दुर्दैवी मृत्यूचा तिला मोठा धक्का बसला असून तिला डॉक्टरांकडे न्यावं लागलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayres sasaki brazilian singer dies electrocution while hugging wet fan asc