Lalbagcha raja 2023: गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकार हे मुंबईतील मोठ्या गणपती मंडळांना भेट देत असतात. गणपती बाप्पाचे आशिर्वाद घेत असतात. मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या चरणी देखील अनेक कलाकार हजेरी लावत असतात. लालबागचा राजा हा मुंबईतील असा गणपती आहे ज्याची एक झलक पाहण्यासाठी लोक लांबून लांबून तिथे येत असतात. तासंतास रांगेत उभे राहतात. गणपतीचे १२ दिवस लालाबागच्या राजाची रांग २४ तास सुरू असते. बाप्पाच्या पायाशी दर्शन मिळणं हे नशीबच समजलं जातं.
सेलिब्रेटींसाठी लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खास आयोजन करतं. पण कधी कधी आयोजनात गडबड झाली तर त्याचा कलाकारांनाही सहन करावा लागतो. कलाकार येणार म्हटल्यावर त्यांचे फॅन्सही त्यांच्या आजूबाजूला गर्दी करतात. अभिनेता आयुष्मान खुराना लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी गेला होता. मात्र दर्शनाआधीच आयुष्मान खुरानाला लालबागच्या गर्दीनं घेरलं आणि आयुष्मान खुराना गर्दीमध्ये चांगलाच अडकला. राजाच्या दरबारातील आयुष्मान खुरानाचा गर्दीमध्ये अडकलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> रेल्वेत प्रवास करताना रात्री दरवाजा उघडा ठेवू नका; महिलेसोबत घडली धक्कादायक घटना, पाहा व्हायरल Video
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, आयुष्मान खुराना गर्दीमध्ये अडकला आहे. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्या बरोबर फोटो काढण्यासाठी पुढे येत आहेत. विक्कीच्या बाजूला पोलीस सुरक्षा देखील तैनात आहे. पण गर्दी इतकी आहे की पोलिसांच्या देखील नाकीनऊ आलेत. इतक्या गर्दीमध्ये आयुष्मान खुराना मात्र फार शांत दिसतोय. कोणतीही चिडचिड त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत नाहीये. त्याच्या या स्वभावाचं चाहत्यांनी फार कौतुक केलंय.