वन्यजीवांशी संबंधित व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. कधी जंगलाच्या मध्यभागी दोन प्राण्यांची तुंबळ भांडण पाहायला मिळतात, तर कधी ते एकमेकांवर प्रेम करतानाही दिसतात. मात्र सिंह, चित्ता किंवा वाघ कोणताही प्राणी समोर आला तरी नेहमीच हल्ला करताना दिसतात. आता जग्वारचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो अजगरावर हल्ला करताना दिसत आहे. जग्वारचा हा मस्त व्हिडीओ ज्या कोणी पाहिला तो आश्चर्यचकित झाला. सहसा असं दृश्य या व्हिडीओमध्ये दिसत नाही.
वाघाचा अजगरावर हल्ला
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक जग्वार तहानलेला असून पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर पोहोचल्याचं दिसून येतं. तो पाणी पिताच नदीत तरंगणारा अजगर त्याच्यापर्यंत पोहोचतो. जग्वारला अजगराचा राग आला आणि तो शिकार करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर तुटून पडला. जग्वार अजगराला तोंडात दाबून तिथून चालत राहिला. बाकीचे प्राणी जग्वारची ही भयानक स्टाइल बघतच राहिले.
आणखी वाचा : बाप रे बाप! गवतासारखा साप? VIRAL VIDEO पाहून सर्वजण हैराण
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : माणसांप्रमाणे दोन पायांवर चालतो हा कुत्रा, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल
हे दृश्य अतिशय धोकादायक आहे
जग्वार आणि अजगरशी संबंधित हा व्हिडीओ wild_animal_shorts_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, ‘हा अॅनाकोंडा आहे अजगर नाही.’ दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, ‘जॅग्वार हा त्याच्या आकारानुसार सर्वात कार्यक्षम शिकारी आहे.’ या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. .