Baba abuses young girl video: आई वडिलांनाच सगळ्याच जास्त मुलांची काळजी असते, असं म्हणतात. आणि या काळजीपोटी आई वडिल काहीही करायला तयार होतात. आपल्या मुलाला थोडंसं खरचटलंदेखील तर आई वडिलांचा जीव कासावीस होतो. ते लगेच आपल्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन जातात त्याच्यावर उपचार करतात. पण सध्या एका पालकांनी आपल्या मुलीला त्रास होतो म्हणून डॉक्टरकडे न नेता एका बाबाकडे नेलं. आणि त्या बाबाने मुलीबरोबर जे केलं ते पाहून तुमचाही राग अनावर होईल. या बाबाचा आणि मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊया…
संतप्त व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, आई वडिल त्यांच्या मुलीला एका बाबाकडे घेऊन आले आहेत. हा बाबा तिच्यावर उपचार करताना या व्हिडीओमध्ये दिसतोय. या उपचारादरम्यान, ती म्हणते, “मला हार्टबीटचा त्रास होतो आणि गुदमरल्यासारखं वाटतं” यानंतर बाबा त्या मुलीच्या स्तनाच्या आजूबाजूला हात लावून काहीतरी करताना या व्हिडीओमध्ये दिसतोय. हे सगळं करत असताना मुलगी खूप अस्वस्थ दिसते आणि त्या बाबाला सांगते की, मला कुठलाच त्रास होता कामा नये. यावर तिची आई तू काही बोलू नकोस असं म्हणून तिला गप करते.
तर बाबा “माझी मुलगी तुझ्यासारखीच आहे” असं म्हणतो आणि नको त्या ठिकाणी पुन्हा तिला हात लावतो. तिला तपासल्यासारखं करून तो म्हणतो, “डायजेशनचा प्रोब्लेम आहे त्याच्यामुळे गॅस होतो.” तसंच तिला तपासत असताना तो इथे दुखतंय का असं विचारत तिच्या स्तनाच्या आजूबाजूला हात लावतो. यादरम्यान, मुलगी खूप घाबरलेली आणि अस्वस्थ दिसतेय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @hellodoctortalks या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “सरकार अशा बाबांवर कारवाई का करत नाही?” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २१ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे असले कसले पालक आहेत, ज्यांना मुलीचा त्रास कळत नाही.” तर दुसऱ्याने “तिच्या पालकांसमोर तिच्यावर अत्याचार झाला” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “तिला वेदना होत आहेत आणि ती खूपच अस्वस्थ आहे, हे पालकांना दिसत नाहीय का?”