चित्रपट असो की सोशल मीडिया किंवा शिखांवर आधारित माहितीपट बाबा अवतार सिंह मौनी यांना आपण अनेकदा पाहिले असेल. डोक्यावर मोठी पगडी त्यावर शिख धर्मातील पवित्र चिन्हे, हातात चांदींची अनेक कडे घातलेले अवतार सिंह अनेकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. डोक्यावर एक दोन नाही तर ४५ किलोंची पगडी घालून जेव्हा अवतार बाबा आपल्या बुलेटवरून निघतात तेव्हा नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्याशिवाय राहत नाही. पण त्यांची अशी ओळख करून देणे चुकूचे ठरले, कारण फक्त भारतातच नाही तर जगात ते प्रसिद्ध आहे. त्यांच्या नावावर सर्वात वजनदार आणि मोठी पगडी परिधान करण्याचा विश्वविक्रम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : फक्त भिका-यांनाच देतो ‘हा’ इंजिनिअर नोकरी

६० वर्ष वय असलेले बाबा अवतार सिंहांची ओळख आहे ती त्यांची पगडी. या पगडीमुळे त्यांच्या नावावर विश्वविक्रम आहे. या पगडीचे वजन आहे तब्बल ४५ किलो. सुमारे ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीच्या कपड्यांपासून बनलेली पगडी ते घालतात. ही लांबलकच पगडी बांधण्यासाठी त्यांना जवळपास ५ तास लागतात. त्यामुळे सकाळी लवकर उठून ते या कामाला लागतात. गेल्या सोळा वर्षांपासून ते अशी पगडी घालत आहे. खरे तर इतके वजन असलेली पगडी कोणी कशी घालू शकतो याचे अनेकांना आश्चर्य वाटते पण ही पगडी माझ्यासाठी डोक्यावरचे वजन नसून आत्मसन्मान आहे असे ते म्हणतात. पगडीच्या आकारामुळे ते वाहनांनी प्रवास करू शकत नाही त्यामुळे ते आपल्या बुलेटवरूनच फिरतात.

‘सिंह इज ब्लिंग’ या २०१५ मध्ये आलेल्या ‘टुंग टुंग बजे’ या गाण्यातही बाबा अवतार सिंह मौनी दिसले होते. तर काही दिवसांपूर्वी ‘हिस्टरी टीव्ही १८’ च्या ‘ओएमजी! ये मेरा इंडिया’ या कार्यक्रमातही बाबा अवतार सिंह मौनी यांच्यावर छोटा माहितपट बनवला होता. फक्त स्थानिकच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी अवतार सिंह यांची दखल घेतली आहे.