‘अंधश्रद्धा’ हा समाजातील काही लोकांमध्ये पसरलेली मोठी गंभीर समस्या आहे, अंधश्रद्धेमुळे अनेक लोक स्वत:चा जीवही धोक्यात घालतात. अंधश्रद्धेला बळी पडलेल्या अनेक लोकांच्या बातम्या आपण वाचत असतो. अशातच आजच्या युगात अनेक बाबांनीही लोकांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेच्या चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा भोंदू बाबांच्या नादाने अनेकांचे मोठे नुकसानही होते, तरीही लोकं त्यांच्या मागून जाणं बंद करत नाहीत.
शिवाय असे अनेक ढोंगी बाबा सध्या तुरुंगातही आहेत. ज्यांच्यावर बलात्कारासह लोकांना अंधश्रद्धेच्या मार्गावर ढकलण्यापर्यंतचे आरोप आहेत . अंधश्रद्धा पसरवून पैसा कमावणाऱ्या बाबांची आपल्या देशात अजिबात कमतरता नाहीये. देशातील अनेक भागात एक तरी भोंदू बाबा भोळ्या लोकांना आपल्या तावडीत अडकवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो.
दारू पिऊन आशीर्वाद देणाऱ्या बाबाचा व्हिडीओ व्हायरल –
अशातच सोशल मीडियावर असाच एका भोंदू बाबाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बाबा दारू पिऊन लोकांना आशीर्वाद देताना दिसत आहे. त्यामुळे दारू पिणं मुळात वाईट आणि अशा बाबाने दिलेला आशिर्वादाने कोणाचे चांगले होऊ शकते का? दारु कोणत्याही समस्येवर उपाय असू शकते का? त्यामुळे हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? असा संतप्त प्रश्न नेटकरी विचारत आहेत. व्हिडिओमध्ये, एक बाबा त्याच्या आसनावर बसला आहे आणि त्याच्या दरबारात लोकाची गर्दी आहे. शिवाय तिथे जमलेले लोक दारु पिणाऱ्या बाबावर फुलांचा वर्षाव करत आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी संतप्त –
बाबाच्या दरबारात मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. भक्तांच्या गर्दीत बाबा दारूच्या बाटल्या काढतो आणि लोकांसमोर बिनधास्तपणे रू प्यायला सुरुवात करतो. यावेळी तो एका झटक्यात दारूची पूर्ण बाटली रिकामी करताना दिसत आहे. या भोंदू बाबाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिलं आहे, “अशा अनेक बाबांनी देशाची वाट लावली आहे, पण खेदाची गोष्ट म्हणजे अशा लोकांचे सत्य जाणून घेण्याची समज अजूनही काहीलोकांमध्ये नाही. काही दिवसात हा भाऊ त्याच्या किडणीसाठी हॉस्पिटलमध्ये पडून असेल.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “अंधश्रद्धेमुळे लोकांना काय करायला मिळत नाही. भक्तांच्या गर्दीवरून अंदाज लावा, दांभिकता किती प्रमाणात नशेला भक्ती मानत आहे.”