बाबा रामदेव यांच्या पतंजलीने पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आले आहे. या क्रेडिट कार्डद्वारे पतंजली आणि पंजाब नॅशनल बँक संयुक्तपणे ग्राहकांना तीन प्रकारचे फायदे देत आहेत. क्रेडिट कार्डने उत्पादनांच्या खरेदीवर ५ ते १० टक्क्यांची सूट दिली जाईल. त्याचबरोबर या कार्डवर पाच लाखांपर्यंतचा अपघाती विमा संरक्षण आणि इतर सुविधाही दिल्या जात आहेत. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, “आमचा हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या स्वप्नाशी सुसंगत आहे. हे क्रेडिट कार्ड कमी उत्पन्न असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात मदत करेल.” क्रेडिट कार्ड लाँच करताना आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, “या कार्डच्या माध्यमातून केवळ पतंजलीच नाही तर इतर ब्रँडवरही सूट मिळणार आहे.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा