Baba Siddique Murder Case Fact Check : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्यानंतर बिहारच्या पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी या गँगला खुले आव्हान दिले आहे. लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गुन्हेगार असून कायद्याने परवानगी दिल्यास २४ तासांत संपूर्ण गँग उदध्वस्त करू, असा दावाही त्यांनी केला. या विधानानंतर पप्पू यादव यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ते रडताना दिसत आहेत. पण, पप्पू यादव यांचा व्हिडीओ खरा आहे का याविषयी आम्ही तपास सुरू केला तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं; ते काय जाणून घ्या…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर चंदन शर्माने त्याच्या X हँडलवर भ्रामक दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
siddhu mussewala fans commented on borthers video
Video : सिद्धू मूसेवालाच्या आठ महिन्यांच्या भावाचं झालं अन्नप्राशन; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, “त्याला प्रत्येक…”
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

इतर युजरदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास :

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला आणि त्यानंतर त्यापासून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तसाप सुरू केला.

यावेळी आम्हाला कोणतेही उपयुक्त परिणाम सापडले नाहीत आणि म्हणून आम्ही YouTube वर कीवर्डचा शोध घेतला आणि संबंधित फिल्टर लागू केले.

यावेळी आम्हाला एबीपी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ मिळाला. हा व्हिडीओ सहा वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता आणि त्याचे शीर्षक होते, खासदार पप्पू यादव म्हणतात, “मला हल्लेखोराने माझ्या जातीबद्दल विचारले” | एबीपी न्यूज

या व्हिडीओतील व्हिज्युअल हे व्हायरल झालेल्या व्हिडीओसारखेच होते.

त्यानंतर आम्ही Google वर कीवर्ड शोध घेतला आणि २०१८ च्या अनेक बातम्या सापडल्या, जेव्हा बिहारचे खासदार पप्पू यादव यांच्यावर मुझफ्फरपूरमध्ये भारत बंददरम्यान हल्ला झाला होता.

https://www.firstpost.com/india/bharat-bandh-bihar-mp-pappu-yadav-claims-he-was-attacked-in-muzaffarpur-police-deny-attack-says-no-proof-given- 5133531.html

https://www.business-standard.com/article/news-ani/bharat-bandh-bihar-mp-pappu-yadav-allegedly-attacked-118090700046_1.html
https://www.aninews.in/news/national/general-news/bharat-bandh-bihar-mp-pappu-yadav-allegedly-attacked201809070025230002/

बातमीत नमूद केले होते की: हल्ल्यानंतर यादव मीडियासमोर भावूक झाले आणि म्हणाले, “मी कधीही कोणाची जात विचारली नाही, कधीही जातीचे राजकारण केले नाही; पण हल्लेखोरांनी आधी माझी जात विचारली आणि नंतर हल्ला केला.”

हेही वाचा – ‘बदला पुरा!’, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुंबईत झळकले देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर्स? Viral Photo खरा की खोटा; वाचा….

आम्हाला इतर अनेक YouTube चॅनेलद्वारे अपलोड केलेला समान व्हिडीओदेखील आढळला.

निष्कर्ष :

भारत बंददरम्यान मुझफ्फरपूरमध्ये हल्ला झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बिहारचे खासदार पप्पू यादव यांचा २०१८ चा जुना व्हिडीओ आताचा असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे. बाबा सिद्दीकीच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारल्यानंतर यादवने लॉरेन्स बिश्नोई टोळीला आव्हान दिल्यानंतर हा व्हिडीओ पुन्हा समोर आला आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.