Baba Vanga Prediction: बल्गेरियाची रहस्यमय महिला बाबा वेंगा यांनी जगाबाबत अनेक भाकिते केली आहेत आणि त्यातील अनेक खरेही ठरली आहेत. २०२२ मध्ये, बाबा वेंगा यांचे आतापर्यंत २ अंदाज खरे ठरले आहेत. आता नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये बाबा वेंगा यांच्यामते देशात आणि जगात काय होणार, अशी उत्सुकता अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. बाबा वेंगा यांनी २०२३ वर्षासाठी ५ भविष्यवाण्या केल्या आहेत ज्या खऱ्या झाल्यास जगात उलथापालथ होऊ शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बाबा वेंगा यांच्या मते २०२३ वर्ष हे केवळ अमुक एका देशासाठीच नव्हे तर पृथ्वीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. २०२३ साली पृथ्वी व अन्य ग्रहांच्या हालचाली या वारंवार व वेगाने झाल्याने मानवी आयुष्यात मोठे बदल दिसून येऊ शकतात. पृथ्वीची कक्षा बदलून नैसर्गिक आपत्तीची शक्यता बाबा वेंगा यांनी व्यक्त केली आहे. तसेच यंदा मानवनिर्मितही काही संकटांची चाहूल लागल्याचे बाबा वेंगा यांनी सांगितले आहे.
२०२३ कसे असेल? काय म्हणतात बाबा वेंगा –
- बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, एक मोठा देश २०२३ मध्ये जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांचे संदर्भ पाहिल्यास रशिया-युक्रेन वाद खूपच चिघळला होता, जर भविष्यात यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अणुबॉम्ब वापरण्याचे संकेत दिले होते, यानुसार बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरू शकते.
- बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
- बाबा वेंगा यांच्या मते, २०२३ मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
- बाबा वेंगा यांच्यानुसार, २०२३ पर्यंत मानव प्रयोगशाळेत जन्माला येईल. प्रयोगशाळेत लोकांचे चारित्र्य, त्वचेचा रंग ठरवला जाईल.
- बाबा वेंगा म्हणतात की, २०२३ मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे.
बाबा वेंगा कोण आहेत?
बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या. बाबा वेंगा यांचे १९९६ साली निधन झाले. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही. बाबा वेंगा यांनी सांगितलेली भाकिते अनुयायांकडून सांगितली जातात.
दरम्यान, बाबा वेंगा यांच्या सर्वच भविष्यवाण्या खऱ्या होतात असे नाही. तरी मागील काही काळातील परिस्थिती पाहता अनेकवेळा बाबा वेंगा यांच्या भाकिताप्रमाणेच परिस्थिती निर्माण झाली होती. २०२३ मध्ये वेंगा यांची भविष्यवाणी खरी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)