Baba Vanga Future Predictions: 2023 च्या शेवटाकडे जग वाटचाल करत असताना आता येणारे नवे वर्ष कसे असेल याविषयी प्रत्येकाच्याच मनात कुतुहूल असेल. आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी तुम्हीही काही योजनांचे मनोरे रचले असतील पण तुमच्या योजनांना जगात घडणाऱ्या घटनांचे पाठबळ मिळणार का हे हे पाहणे महत्त्वाचे आहे. याच भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाच्या दिवंगत महिला ज्योतिषी बाबा वंगा यांची २०२४ साठीची काही भाकिते चर्चेत आहेत. काही अत्यंत भयंकर तर काही अत्यंत आशावादी भविष्यवाणी बाबा वंगा यांनी केलेल्या आहेत. पण त्यांच्या या बोलण्यावर विश्वास का ठेवावा, यापूर्वी त्यांची कोणती भाकितं खरी झाली आहेत याविषयी सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे वाटतं. म्हणूनच आज आपणबाबा वंगा यांनी केलेल्या कोणत्या भविष्यवाण्या खऱ्या झाल्या आहेत किंवा त्याला मिळती जुळती स्थिती निर्माण झाली आहे हे पाहूया..

बाबा वंगा यांची खरी ठरलेली भाकितं (Baba Vanga Future Predictions)

कुर्स्क

१९८० मध्ये, बाबा वांगा यांनी रशियामधील कुर्स्क शहर “पाण्याने झाकलेले असेल आणि संपूर्ण जग त्यामुळे दुःखी” असेल असा दावा करत एका भयानक घटनेची कल्पना केली होती. ऑगस्ट २००० मध्ये शहराजवळ आण्विक पाणबुडी बुडाल्याने एकूण १८८ क्रू मेंबर्स मृत्यू पावले होते.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

9/11 चा हल्ला

जगातील आतापर्यंतचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला, ज्यात जवळपास ३००० लोकांनी प्राण गमावले त्याविषयी १९८९ मध्ये, त्या कथितपणे म्हणाल्या होत्या की, “भयानक, भयपट! ‘स्टील बर्ड्स’ कडून हल्ला केल्यावर अमेरिकन बांधव पडतील. लांडगे झुडुपात ओरडतील आणि निष्पाप रक्त वाहू लागेल.” आपल्यालाही ठाऊक असेलच की. यातील ‘स्टील बर्ड्स’ म्हणजे २००१ मध्ये 9/11 रोजी अल-कायदाच्या अपहरणकर्त्यांनी वापरलेले विमान-वजा-क्षेपणास्त्र असल्याचे म्हटले जाते.

बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प

बाबा वंगा यांनी लिहिले होते की, ४४ वे यूएस राष्ट्राध्यक्ष हे पहिले व शेवटचे कृष्णवर्णीय प्रतिनिधी असतील. शिवाय काही दाव्यांमध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत काय घडेल याचाही अंदाज लावला होता. त्या म्हणाल्या की, “नागरिक त्यांच्यावर विश्वास व आशा ठेवतील, परंतु उलट होईल. तो देशाला खाली आणेल आणि उत्तर आणि दक्षिण राज्यांमधील संघर्ष वाढेल.”

पूर व दुष्काळ

बाबांनी वरवर पाहता २०२२ मध्ये बर्‍याच तीव्र हवामान घटनांचे भाकीत केले होते जे काही प्रमाणात खरे ठरले. त्यांनी भाकीत केले की जगभरातील अनेक मोठ्या शहरांना मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि पाणी टंचाईचा फटका बसेल. त्या वर्षी, यूकेमध्ये १९३५ नंतरचा सर्वात कोरडा जुलै होता, १२ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, फ्रान्स, इटली आणि पोर्तुगालसह युरोपातील इतर देशांनाही दुष्काळाचा सामना करावा लागला. तर ऑस्ट्रेलिया आणि आशियामध्ये पूर येईल असाही दावा त्यांनी केला होता.

स्वतःचा मृत्यू

बाबांनी, तिच्या मृत्यूच्या सहा वर्षांपूर्वी, ११ ऑगस्ट १९९६ रोजी तिचा मृत्यू होईल असे भाकीत केले होते. तिच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी, तिने दावा केला होता की फ्रान्समधील एका १० वर्षीय अंध मुलीला तिची शक्ती वारसा रूपात मिळेल.

हे ही वाचा << २०२४ मध्ये जगावर सात मोठी संकटं घोंगावतायत? बाबा वेंगा यांची येत्या वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

बाबा वांगा कोण आहेत?

बाबा वांगा, ज्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा आहे, १९९६ मध्ये ८४ व्या वर्षी त्या मृत्यू पावल्या , परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे काही अंदाज खरे ठरत आहेत. १२ व्या वर्षी जेव्हा त्यांची दृष्टी गेली तेव्हा भयंकर वादळाच्या वेळी त्यांना भविष्याचे अंदाज बांधण्याची शक्ती प्राप्त झाली असे मानले जाते. तेव्हापासून, इतिहासातील काही धक्कादायक घटनांचा अंदाज त्यांनी लावला होता असेही चर्चेत आले. ‘बाल्कनचा नॉस्ट्राडेमस’ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. वंगा यांचे अंदाज कुठेही लिहून ठेवण्यात आलेले नसले तरी त्यांच्या अनुयायांकडून ते वर्षानुवर्षे सांगितले जात आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व चर्चांवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही.)

Story img Loader