उद्या काय होणार याविषयी प्रत्येकालाच कुतूहल असते पण भविष्यवाणी करणे म्हणजे कोणाचंही काम नाही. जर तुम्हालाही ज्योतिष, भविष्य, कुंडली याविषयांबाबत उत्सुकता असेल तर आपणही बाबा वेंगा हे नाव नक्कीच जाणून असाल. बाबा वेंगा म्हणजे वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा हे एक प्रसिद्ध ज्योतिषी होते त्यांनी अनेक घटनांबाबत तंतोतंत खरी भविष्यवाणी केल्याचे सांगितले जाते. बाबा वेंगा यांच्या निधनापूर्वीच त्यांनी काही विषयांवर भविष्यवाणी केली होती, यात २०२२ मध्ये काय घडणार हे ही त्यांनी सांगितले होते. अलीकडेच घडलेल्या काही प्रसंगांवरून ही भविष्यवाणी खरी सिद्ध झाली आहे.
बाबा वेंगा यांच्या दोन भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या
बाबा वेंगा यांनी असे भाकीत केले होते की २०२२ मध्ये आशियाई व ऑस्ट्रेलियन देशांमध्ये पुरामुळे मोठे संकट येईल. हे भाकीत आता खरे होण्याच्या मार्गावर आहे कारण यंदा या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. भारताच्या उत्तर पूर्व भागात तसेच बांग्लादेश व थायलँड सुद्धा पूराने प्रभावित आहे. तर याउलट आणखी एक भाकीत वेंगा यांनी केले होते की काही भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती सुद्धा उद्भवेल, सध्याची युरोप मधील परिस्थिती अशीच काहीशी आहे. न्यूज कॉर्प च्या रिपोर्टनुसार पोर्तुगाल सरकारने आपल्या देशवासियांना कमी पाणी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर इटली मध्ये सुद्धा १९५० नंतर यंदा पहिल्यांदाच दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
आता या चार भविष्यवाणी खऱ्या झाल्या तर…
बाबा वेंगा यांनी निधनाच्या आधी आणखी चार भविष्यवाण्या केल्या आहेत, ज्यानुसार सायबेरिया मध्ये एक घातक व्हायरस, एक एलियन हल्ला, एक टोळ किड्यांचा हल्ला आणि व्हर्च्युअल रिऍलिटीच्या वापरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये बल्गेरिया मध्ये झाला होता वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी एका मोठ्या वादळात त्यांना आपली दृष्टी गमवावी लागली. रिपोर्ट्स नुसार, वादळामुळे वेंगा यांच्या डोळ्यात प्रचंड धूळ व रेती गेली होती परिणामी त्यांना दिसणे बंद झाले होते. मात्र याच वेळी त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती प्राप्त झाल्याचे म्हंटले जाते. वेंगा यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने डोळ्यांवर उपचार करणे शक्य झाले नाही परिणामी वेंगा आपले संपूर्ण आयुष्य अंधत्वासह जगले.