Baba Vanga Predictions for 2025 :जगभरात असे लाखो लोक आहेत, जे भविष्य माहीत असल्याचा दावा करतात. पण, ज्यांची भाकिते इतरांपेक्षा जास्त प्रमाणात खरी ठरतात त्यांनाच जगभरात ओळखले जाते. अशीच एक भविष्य सांगणारी व्यक्ती म्हणजे नेत्रहीन बल्गेरियन महिला वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा ऊर्फ बाबा वेंगा. बाबा वेंगाची भविष्यवाणी तिच्या मृत्यूच्या २८ वर्षांनंतरही लोकांची उत्सुकता वाढवत आहे. बाबा वेंगाच्या भाकितांवर जगभरातील लोक विश्वास ठेवतात. बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी करणारी अनेक भयानक भाकिते मांडली आहेत. जगाचा अंत कधी होणार हेही तिने आपल्या भविष्यवाणीत सांगितले आहे. दुसरे महायुद्ध, चेकोस्लोव्हाकिया व युगोस्लाव्हियाचे विभाजन, चेर्नोबिल अणू दुर्घटना, स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख अशी अनेक भाकिते तिने केली होती, जी नंतर खरी ठरली. अशा परिस्थितीत प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की, बाबा वेंगा यांनी नवीन वर्षासाठी काय भविष्यवाणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा