Baba Vanga Prediction For 2024: २०२३ च्या शेवटच्या महिन्यात प्रवेश करताना आता सर्वांनाच पुढील वर्षाचे वेध लागले आहेत. नवीन वर्ष कसे असेल याबाबत तुमच्याही मनात उत्सुकता असेलच. दरवर्षी डिसेंबर महिना आला की सोशल मीडियावर एक नाव चर्चेत असते ते म्हणजे बाबा वेंगा, बल्गेरियाची रहस्यमय महिला बाबा वेंगा यांनी जगाबाबत अनेक भाकिते केली आहेत आणि त्यातील अनेक खरेही ठरली आहेत. २०२३ मध्ये सुद्धा त्यांनी जगात नैसर्गिक व मानवनिर्मित अनेक मोठ्या संकटाच्या घडामोडी घडतील असे भाकीत केले होते. जग युद्धाच्या दिशेने वळणार असल्याची भविष्यवाणी इस्त्रायल – पॅलेस्टाईन युद्धाच्या रूपात तर निसर्गाचा कोप होण्याचे भाकीत हे ठिकठिकाणी आलेल्या पूर व भूकंपाच्या घटनांनी खरे झाले असल्याचेच म्हणावे लागेल. आता येत्या नववर्षाची सुद्धा बाबा वेंगा यांनी काही चिंताजनक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यावरच एक नजर टाकूया..

पुतीनपर्वाचा अंत?

बाबा वेंगा यांनी पुढील वर्षी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे हा प्रयत्न आंतरराष्ट्रीय शत्रूपेक्षा देशातीलच एखाद्या व्यक्तीकडून होऊ शकतो असे त्यांनी भाकीत केले आहे.

Trigrahi Yog on Dhanteras 2024:
Trigrahi Yog : १०० वर्षानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी निर्माण होणार त्रिग्रही योग, या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Ethiopia is only country in world having 13 months in a year
जगापेक्षा सात वर्षांनी मागे असलेला देश माहितीये का? एका वर्षात असतात चक्क १३ महिने
Narak Chaturdashi 2024 Date Confusion| Narak Chaturdashi 2024
Narak Chaturdashi 2024 : आज साजरी केली जाईल नरक चतुर्दशी; अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त नेमका कधी?
Grah Gochar 2024 : maa Lakshmi will give immense money
लक्ष्मीपूजनापूर्वी ५ मोठे ग्रह करणार गोचर, लक्ष्मी देणार ‘या’ पाच राशींना दिवाळी गिफ्ट, मिळणार अपार पैसा
Diwali is in next week There will be various events in sky as well
दिवाळीत अवकाशात मनमोहक घडामोडींची पर्वणी,पृथ्वीवरुन पाच ग्रहांचे…
Dev Uthani Ekadashi 2024 Date in Marathi | Kartiki Ekadashi 2024 Date
Dev Uthani Ekadashi 2024 Date : यंदा कार्तिकी एकादशी नेमकी कधी आहे? जाणून घ्या, कोणत्या तारखेपासून सुरू होणार शुभ कार्य?
Budh Gochar 2024
५ वर्षांनंतर धनत्रयोदशीला निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! ‘सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार

दहशतवाद आणि जैविक हल्ले

बाबा वेंगा यांनी युरोपला दहशतवादी हल्ल्यांना सामोरे जावे लागेल असेही भाकीत केले आहे. त्यांच्या मते जगातील एखादा मोठा देश युरोपवर हल्ला करू शकतो.

२०२४ मध्ये मोठे आर्थिक संकट

पुढच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, कर्जाची वाढती पातळी आणि वाढता भौगोलिक व राजकीय तणाव हे अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे मुख्य घटक ठरतील.

हवामानाचा त्रास

पुढच्या वर्षी हवामानाची गुणवत्ता कमी होऊन नैसर्गिक आपत्ती येतील असेही त्यांनी भाकीत केले आहे.

अधिक सायबर हल्ले

सायबर हल्ल्यांमध्ये वाढ होईल, प्रगत हॅकर्स हे पॉवर ग्रिड्स (वीज) आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स (पाणी) यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकेल.

वैद्यकीय प्रगती

वैद्यकीय प्रगतीमुळे २०२४ मध्ये अल्झायमर आणि कर्करोगासारख्या असाध्य रोगांवर नवीन उपचार उपलब्ध होतील असे वेंगा यांनी म्हटले आहे.

तांत्रिक प्रगती

क्वांटम कंप्युटिंगमध्ये मोठी प्रगती होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, वेंगाने २०२५ ते २०२८ दरम्यान जागतिक उपासमारीवर उत्तर शोधले जाईल तसेच, 2076 पर्यंत समाजवादी विचारांचे वारे पुन्हा वाहू लागतील असेही अंदाज वर्तवले आहेत.

कोण आहे बाबा वेंगा?

बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ ​​बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध ज्योतिष होत्या. बाबा वेंगा यांचे १९९६ साली निधन झाले. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही. बाबा वेंगा यांनी सांगितलेली भाकिते अनुयायांकडून सांगितली जातात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)