Dr. B.R. Ambedkar Marathi Thoughts HD Images: ।मरावे परी कीर्तीरुपी उरावे। अशी उक्ती ज्या महामानवाने सार्थ करून दाखवली अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांवर आजच्याच दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला होता. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला आणि आता हे ठिकाणी पवित्र चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही जगण्याच्या एक नवा दृष्टिकोन व दिशा देतात. आजच्या या महत्त्वाच्या दिवशी त्यांच्या विचारांचंच जतन करून, त्यांचा अवलंब करून, व इतरांपर्यंत पोहोचवणं हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरू शकते. डॉ. आंबेडकरांचे विचार आपल्या Whatsapp स्टेट्स, इंस्टाग्राम व फेसबुक पोस्ट, स्टोरी,तसेच अन्य सोशल मीडियावरून तुमच्या मित्र व कुटुंबासह नक्कीच शेअर करण्यासाठी खालील HD Images मोफत डाउनलोड करू शकता.
लक्षात घ्या, आंबेडकरांचे विचार हे फॉरवर्ड करताना तेच स्वतःमध्ये रुजवल्यास हीच या महामानवास महापरिनिर्वाण दिनी विशेष भेट असेल.