Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ हे हसवणारे असतात तर काही रडवणारे; तर काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला भाग पाडणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणत्याही मुलासाठी त्याचे आई-वडील हे देवापेक्षा कमी नसतात. मुलगा मोठा झाला की तो तारा बनतो आणि त्याचे वडील ‘महा’तारा बनतात. मुलगा मोठा होतो आणि वडील थकतात, यावेळी वडिलांनंतर घरची जबाबदारी मुलगा घेतो.
पक्षांचा ‘हा’ VIDEO विचार करायला भाग पाडेल
दरम्यान, आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान असे म्हटले जाते. खरतंर म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण, यावेळी मुलांनी पालकांना समजून घेणं आवश्यक असतं. अशावेळी फक्त आपल्याच आयुष्यात हे चक्र फिरत नाही, तर प्राणी पक्षांचंही आयुष्य याच सर्कलमध्ये सुरू असतं. अशाच दोन पक्षांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुम्हालाही विचार करायला नक्की भाग पाडेल.
“वेळ बदलते आणि कर्तव्य पण बदलतात”
ज्याप्रमाणे वडील थकल्यावर मुलगा घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन आई-वडिलांचा आधार बनतो, त्याचप्रमाणे पक्षांमध्येही असतं हे तुम्हाला माहितीये का? या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पक्षी खूप थकलेला दिसत असून एका फांदीवर बसला आहे. यावेळी एक छोटा पक्षी येतो आणि आपल्या चोचीतलं अन्न मोठ्या पक्षाला खाऊ घालतो. ज्याप्रमाणे आपल्या थकलेल्या वडिलांना एखादा मुलगा भरवतो त्याचप्रमाणे हा पक्षी आपल्या वडिलांना भरवत असल्याचं वाटत आहे. वेळेनुसार सगळ्या गोष्टी बदलतात; तसंच कर्तव्य, जबाबदाऱ्याही बदलत असतात हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. एकवेळ अशी असते जेव्हा वडील आपल्या मुलाची काळजी घेतात, त्याला काय हवं नको ते पाहतात, तर एक वेळ अशी येते मुलाला वडिलांची काळजी घ्यावी लागते. याचप्रकारे हा छोटा पक्षी मोठ्या पक्षाची काळजी घेताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Photo: “परफेक्ट जोडी फक्त…बाकी सर्व अंधश्रद्धा” ही पुणेरी पाटी वाचून पोट धरुन हसाल
या व्हिडीओतून युजरने आपल्या आई-वडिलांची काळजी कशी घेतली पाहिजे असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ sethal_15 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर “वेळ बदलते आणि कर्तव्यसुद्धा बदलतात, काळजी घ्या त्यांची” असा आशय लिहला आहे.
व्हिडीओवर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. काही जण भावूक झाले आहेत, तर काहींनी व्हिडीओचं कौतुक केलं आहे.