आपल्याकडे ग्रहणाच्या दिवशी मूल जन्माला येणे अशुभ मानले जाते. मात्र अमेरिकेमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रहणाच्या दिवशीच जन्माला आलेल्या एका मुलीचे नावच ईकलिप्स (म्हणजेच ग्रहण) असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जन्माला आल्याआल्याच आपल्या जगावेगळ्या नावामुळे ही मुलगी चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२१ ऑगस्ट रोजी अमेरिकेमधून जवळजवळ ९९ वर्षांनंतर ग्रहण पाहता आले. ग्रहणाचा कालावधी संपून त्याबद्दल चर्चा सुरु असतानाच स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी दक्षिण कॅरोलिनामधील ग्रीनव्हीले मेमोरीयल हॉस्पिटलमध्ये एका गोंडस बाळाचा जन्म झाला आणि युबंक्स दांपत्य आई-वडील झाले. विशेष म्हणजे बाळाच्या आईचे नावही फ्रीडम (म्हणजे स्वातंत्र्य) असे आहे. फ्रीडम आणि मायकल यांना ३ सप्टेंबरपर्यंत बाळाचा जन्म होईल असं सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या छोटीसाठी व्हॉयलेट हे नाव निश्चित केले होते.

मात्र संपूर्ण अमेरिकेचे लक्ष्य आकाशात शतकभरानंतर होणाऱ्या घटनेकडे लागून राहिलेले असताना फ्रीडमच्या पोटात कळा यायला लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी ती एका गोंडस मुलीची आई झाली. बाळ ठणठणीत आणि सुदृढ असल्याचे हॉस्पिटलने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. हॉस्पिटलच्या फेसबुक पेजवरील मेसेजमधील मजकुरानुसार अगदी शेवटच्या क्षणी मुलीच्या आई-बाबांनी तिचे नाव ‘ईकलिप्स’ ठेवण्याचे ठरवल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुलीचे हे विचित्र नाव ऐकून पहिल्यांदा माझ्या घरच्यांना धक्काच बसला. पण आता त्यांना ती कल्पना छान वटाली असून त्यांना मुलीचे नावही आवडले आहे. हॉस्पिटलनेही या बाळाला ग्रहणासंदर्भातील काही गोंडस खेळणी भेट दिली आहेत.