राजस्थानच्या अजमेरमध्ये दोन डोके असलेल्या मुलाचा जन्म झाला आहे. डॉक्टरांनी हे मुल म्हणजे दैवी चमत्कार असल्याचे म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये या मुलाचा जन्म झाला. दोन डोके असलेल्या बाळाचा जन्म झाल्याची बातमी समजताच अनेक जणांनी या बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली.
या बाळाला रुग्णालयात विशेष निरिक्षण कक्षात ठेवण्यात आले होत. शस्त्रक्रिया करून ही दोन डोके वेगळी करता येतील का यावर डॉक्टरांनी चर्चा केली. पण हे अशक्य असल्याने तसेच या बाळाच्या जीवाला धोका असल्याने डॉक्टरांनी हा निर्यण बदला. या बाळाला दोन डोके असले तरी त्यांचे शरीर मात्र एकच होते त्यामुळे त्यांना विलग करणे अशक्य होते. अजमेरमधल्या एका वीस वर्षीय महिलेने या बाळाला जन्म दिला. जन्माच्या वेळी या बाळाची प्रकृती स्थिर होती पण त्याला श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्याची रुग्णालयातच विशेष काळजी घेण्यात येत होती. बाळाचा जन्म झाल्यानंतर दुस-याच दिवशी त्याचा आई- वडिलांनी त्याला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी मात्र या आई वडिलांना मुलांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले पण पालकांनी डॉक्टरांच्या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
आई वडिलांच्या या बेजबाबदार वागण्याची शिक्षा मात्र या बाळाला मिळाली. घरी आणल्यानंतर अवघ्या काही तासांत या बाळाचा मृत्यू झाला. या दांम्पत्याचे हे पहिले अपत्य होते. जन्म दिल्यानंतरच ३२ तासांत या बाळाचा मृत्यू झाला त्यामुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.
सयामी जुळ्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी
पण दुर्दैवाने बाळाचा झाला मृत्यू
Written by लोकसत्ता टीम
First published on: 06-10-2016 at 16:01 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby born with two heads in india everyone wanted to catch a glimpse