मगर ही पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी आहे, मगरीजवळ जाणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाण्यासारखं असतं. कारण मगर पाण्यात असो वा जमिनीवर ती तिच्या आसपास आलेल्या प्राण्यावर किंवा माणसावर जीवघेणा हल्ला करते. शिवाय तिच्या तावडीतून सुटणं अशक्य असतं. मग ती मगर लहान असो वा मोठी. पण सध्या एका अशा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने मगरीच्या पिल्लाला कमी धोकादायक समजल्यामुळे त्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलं माणसांची असो वा प्राण्यांची, दोघांनाही ती प्रिय असतात. काही मुलं दुरून जितकी गोंडस आणि सरळ वाटतात तितकीच ती मस्तीखोर असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने मगरीच्या पिल्लाला कमजोर समजून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण तो हल्ला त्याच्यावरच उलटला आहे, कसं ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतर समजेल.

हेही पाहा- आजीला सायकलवरुन नेण्यासाठी पठ्ठ्याने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्तीने मगरीच्या पिल्लाला कमजोर समजल्यामुळे त्याला अशा संकटाला सामोरं जावं लागतं जे त्याला आयुष्यभर लक्षात राहिल यात शंका नाही. व्हिडीओमध्ये मगरीच्या पिल्लावर हल्ला करणं व्यक्तीला महागात पडल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये मगरीचे पिल्लू त्याच्यावर हल्ला करणाऱ्याला चांगलाच धडा शिकवते.

हेही पाहा- धावत्या कारवर अचानाक कोसळली वीज, धूर निघायला लागला अन्…, अंगावर शहारा आणणारा Video पाहाच

व्हिडीओमध्ये, एका माणसाने मगरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मगरीचे पिल्लू त्याच्यावर वारंवार हल्ला करते. पिल्लाच्या हल्यात ती व्यक्ती पहिल्या आणि दुसर्‍यांदा बचावते, पण तिसर्‍या वेळी मात्र ते पिल्लू त्याच्या हातावर आपल्या तीक्ष्ण दातांनी पकडते. या वेळी तो व्यक्ती कसाबसा मगरीच्या तावडीतून आपला हात सोडवतो. पण त्याला चांगलीच दुखापत झाल्याचं दिसत आहे.

हा व्हिडिओ @ViciousVideos नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर ९ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मगर जर त्याच्यापेक्षा थोडी मोठी असती तर त्या व्यक्तीची शिकार झाली असती. दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलं की, ‘मूर्ख, खिशातील चाकूने मगरीला मारण्याचा प्रयत्न करत आहे.’ अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. सर्वांनी त्या व्यक्तीला मुर्ख असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby crocodile attack on man the video of the thrilling incident is going viral jap