Man rescues baby dolphin Video Viral : पाण्यात देवमासा असतो, हे सर्वांनाच माहित आहे. पण माणसातही देव असतो, हे एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आलं आहे. पाण्यात टाकलेल्या एका फिशिंग नेटमध्ये डॉल्फिन मासा अडकला होता. या डॉल्फिन माशाचा जीव धोक्यात असल्याचं एका तरुणाने पाहिलं. त्यानंतर त्या तरुणाने डॉल्फिन माशाजवळ बोट नेली आणि जाळ्यात अडकलेल्या या माशाला कोणत्याही प्रकारची इजा न करता सुरक्षीत पाण्यात सोडून दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माशाचा जीव वाचल्यानं त्या तरुणाचा आनंदाला पारावारच उरला नसल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मासा जिवंत असल्याने त्याला मनस्वी आनंद झाला आणि त्या तरुणाने डॉल्फिनला चुंबन देत पाण्यात सुखरून सोडून दिलं. या माशासाठी हा तरुण देवदूत बनल्याने सोशल मीडियावरून या तरुणाच्या कार्याला सलाम ठोकलं जात आहे. या व्हायरल व्हिडीओला नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करत असून तरुणावर स्तुतिसुमनेही उधळत आहेत.

नक्की वाचा – बापरे! जंगलात फोटोग्राफी करताना अचानक सिंहाने घेरलं अन् घडलं…आनंद महिंद्रांनी शेअर केला थरकाप उडवणारा Video

इथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियाच्या ट्वीटर हॅंडलवर हा व्हिडीओ @Gabriele_Corno नावाच्य यूजरने शेअर केला आहे. एक डॉल्फिन मासा जाळ्यात अडकल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी एक तरुण बहादूरीने आणि दयेचं दर्शन घडवत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. प्राण्यांवर प्रेम करणारी अनेक माणसं या जगात आहेत. त्यांनाही वेदना होतात, याची जाणीव काही माणसांना असते. त्यामुळे अशी माणसं या प्राण्यांवर दया करून त्यांच्या जीव वाचवत असतात. या तरुणानेही डॉल्फिन माशाचा जीव वाचवून लाखो लोकांचं हृदय जिंकलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून एक मिलिनयहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणाला हिरो म्हणून संबोधलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, तुम्ही या जगात सुरक्षित राहण्यासाठी थोडी जागा बनवली आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून प्राण्यांना संकटात सापडल्यानंतर मदत करण्याचं आवाहनच करण्यात आलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक पेचप्रसंग उभे ठाकतात. त्यावेळी आपल्याला कुणाच्या तरी मदतीची अपेक्षा असते. माणसांना बोलता येत असल्याने ते आरडाओरडा करून संकटात सापडल्याचे संकेत देऊ शकतात.

पण मुक्या प्राण्यांना मात्र काहीच करता येत नाही. त्यांच्या जीव धोक्यात असल्यावर एखाद्या व्यक्तीने पाहिलं, तरच त्यांची सुटका करता येते. नाहीतर अशा प्राण्यांना तडफडून आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी जबरदस्त संदेश दिला आहे की, जिथे कुठे प्राणी संकटात असतील, त्यांना मदत करून त्यांचे प्राण वाचवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby dolphin trapped in fishing net man rescues dolphin fish in an ocean this viral video melt lakhs of netizens hearts nss