मानवाइतक्या भावना इतर कोणत्याही प्राण्यांना नसतात असं म्हटलं जातं. मात्र अनेक प्रयोगांमधून इतर प्राण्यांनाही मानवाप्रमाणेच भावना असल्याचे सिद्ध झालं आहे. अनेकदा प्राण्यांच्या वर्तवणुकीमधूनही याचा अभनुभव येतो. प्राण्यांनाही विरहामुळे दु:ख होतं हे दाखवणारा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हफिंग्टन पोस्ट या वेबसाईटने २०१३ साली जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये आईने जवळ घेण्यास नकार दिल्याने हत्तीचं पिल्लू जवळजवळ पाच तास रडत होतं असं म्हटलं आहे. चीनमधील शेंडीयॅशॅन वन्यप्राणी संवर्धन केंद्रातमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. हत्तीणी आणि तिच्या पिल्लामध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. त्यानंतर रागावलेल्या हत्तीणीने पिल्लावर हल्ला करत त्याला किरकोळ जखमी केलं. मात्र पिल्लू नंतर आईच्या जवळ जाऊ लागले तेव्हा तिने त्याला स्वीकारण्यास नकार दिला. सामान्यपणे हत्तीणीला गरोदर असते तेव्हा बाळांपणाच्या वेळी तिला खूप त्रास सहन करावा लागतो. अशावेळेस कळपातील इतर सदस्य तिच्या सोबत राहून तिला आधार देतात. मात्र असं झालं नाही आणि हत्तीणीने एकांतामध्ये बाळाला जन्म दिल्यास ती बाळाला नाकारण्याची शक्यता अधिक असते असं अभ्यासक सांगतात.
या हत्तीला त्याच्या आईने नाकारल्यानंतर तो जवळजवळ पाच तास रडत होता असे प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्तामध्ये म्हटलं होतं. आपल्या बाळाला नाकारल्यानंतर हत्तीणीलाही नैराश्य आल्याने तिनेही काही दिवस खाणंपिणं सोडून दिल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. हत्ती हे मानवाप्रमाणेच असतात, त्यांनाही भावनिक आधाराची गरज असते असं अनेक अभ्यासांमधून दिसून आलं आहे.
युट्यूबवर या व्हिडिओला ३३ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.