लहानपणी जेव्हा आपण जंगलातील गोष्टी ऐकल्या, त्यात हत्तीचा उल्लेख आला नाही असं होऊच शकत नाही. जेव्हा जेव्हा हत्तीचा विषय आला तेव्हा तेव्हा तो विशालकाय आहे, असं आवर्जून सांगितलं जायचं. पण हत्ती किती मस्तीखोर आहे, हे तुम्हाला कदाचित कोणी सांगितलं असेल किंवा पाहिलं असेल. सध्या असाच एक सुंदर व्हिडीओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे, जो पाहून तुमचा दिवस आनंदात जाईल. अनेकदा लहान मुलं पाणी दिसलं की, त्याच्याशी खेळायला लागतात, फक्त माणसांची मुलंच असं करतात असं नाही बरं का. तर प्राण्यांची पिल्लं सुद्धा असंच करतात. या व्हायरल व्हिडीओमधल्या हत्तीचं एक पिल्लू पाण्यात फुटबॉल खेळताना दिसून येत आहे. हे पाहून तुम्हाला खूप गोंडस वाटेल. व्हिडीओमध्ये छोटा गजराज पाण्याचा मनसोक्त आनंद घेत आहे. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका तलावाच्या शेजारी दोन मोठे हत्ती काहीतरी खाताना दिसून येत आहेत. हे दोन्ही हत्ती खाण्यात मग्न असताना हत्तीचं पिल्लू मात्र भलत्याच कामात व्यस्त आहे. या हत्तीच्या पिल्लाला पाण्यात फूटबॉल पडलेला दिसून आला. हे पाहून हत्तीचं पिल्लू धावत या फूटबॉलकडे आला आणि त्याच्या खेळू लागला. या पिल्लाचा आनंद पाहून असं वाटतंय की, जणू काही सुट्टीत तो फिरायला इथं आला आहे. कधी तो आपल्या सोंडेने फूटबॉलला पकडताना दिसतोय तर कधी आपल्या पायाने फूटबॉलला किक मारताना दिसून येतोय. या हत्तीच्या करामती पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. सर्वात गंमत तर तेव्हा होते जेव्हा हा हत्तीचा पिल्लू पाण्यात फूटबॉलसोबत खेळता खेळता अचानक तोड जाऊन पडतो.
पाण्यात पडल्यानंतर या हत्तीच्या पिल्लूची मस्ती इथेच थांबत नाही, तर पाण्यात हातपाय पसरून आनंद लुटतोय. तो अगदी बेधुंदपणे बागडताना आपण पाहू शकतो. त्यानंतर पुन्हा एकदा तो फूटबॉलसोबत खेळायला सुरूवात करतो. फूटबॉलसोबत खेळता खेळता तो आपल्या सोंडेने फूटबॉलला पाण्याबाहेर आणतो आणि पुन्हा पाण्यात जाऊन मनसोक्त खेळताना दिसून येतोय. हा व्हिडीओ पाहून कुणीही या हत्तीच्या पिल्लाच्या प्रेमात पडेल .
भारतीय वन अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर हत्तीच्या पिल्लाची मस्ती पाहून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत २४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. वन अधिकारी सुशांत नंदा हे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नेहमीच जंगलातील प्राणी, पक्षी आणि साप यांचे मनोरंजक व्हिडीओ शेअर करत असतात.
आणखी वाचा : Bride Dance Video : स्वतःच्याच लग्नात नवरीने केला इतका जबरदस्त डान्स की लोक जोरजोराने ओरडू लागले…
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्नात वहिनीसोबत मस्करी करणं दीराला महागात पडलं…नवरीने जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल अवाक
हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर मन भरत नाही आणि पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. हा व्हिडीओ पाहून लोक खूश होत आहेत. या व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडलेला दिसतो आहे, कारण या व्हिडीओला अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट आणि शेअर करण्यात आलं आहे.