निलगीरीमध्ये जंगलामध्ये एका खोल वाळूच्या विहिरीत एक हत्तीच्या पिल्लू चुकून पडले होते. त्यामुळे हत्तीच्या पिल्लाची आपल्या आईपासून ताटातुट झाली. हत्तीच्या पिल्ला वाचवण्यासाठी ८ वन अधिकाऱ्यांच्या पथक प्रयत्न करत होते. अखेर त्यांना यश आले आणि हत्तीच्या पिल्ला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाच्या कामगिरीचे कौतूक केले जात आहे. वन अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे एका हत्तीच्या पिल्लाची आपल्या आईसह पुन्हा भेट झाली. IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी बचाव मोहिमेची छोटी क्लिप शेअर केली.

“तामिळनाडूमध्ये एका हत्तीच्या पिल्लाची यशस्वीपणे सुटका करण्यात आले आणि त्याची त्याच्या आईशी पुन्हा भेट घडवून देण्यात आली. हृदयस्पर्शी घटना सध्या चर्चेत येत आहे. निलगिरीमधील गुडालूर वनविभागात ही घटना घडली. एका शेतजमिनीवर ३० फूट खोल वाळूच्या विहिरीमध्ये एका अल्पवयीन हत्ती चुकून पडला होता. त्याची सुटका करण्यासाठी तामिळनाडू वन रक्षकांनी आठ तासांची बचाव मोहिम राबवली होती.

6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

हेही वाचा – बातम्या सांगणाऱ्या अँकरच्या तोंडात गेली माशी….पुढे जे घडले ते पाहून बसेल धक्का! पाहा Viral Video

सुप्रिया साहू यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, की” . “आठ तासांच्या आव्हानात्मक लढाईनंतर हत्तीला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यासाठी रॅम्प बनवण्यात टीम यश आले. बचावकार्यानंतर टीमने हत्तीच्या पिल्लाची त्याच्या आईबरोबर भेट घडवून आणली. पिल्लापासून दुरावलेली आई हत्तींच्या कळपाबरोबर मोठ्या धीराने वाट पाहत थांबली होती. पहाटे ३ वाजल्यापासून ४० लोकांच्या टीमसह ऑपरेशनचे नेतृत्व करणारे डीएफओ गुडालूर, वेंगटेश प्रभू यांचे खूप कौतुक आहे.”

हेही वाचा – “स्वतःला सुपरमॅन समजतो”, चालत्या कारवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट, Viral video पाहून संतापले नेटकरी

या महिन्याच्या सुरुवातीला, सुप्रिया साहू यांनी हत्तीच्या कुटुंबाचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये दिसणारे हत्ती कुटुंब जंगलात कुठेतरी “आनंदाने” झोपलेले दिसले. तामिळनाडूमधील अनामलाई व्याघ्र प्रकल्पातील खोल जंगलातील हे हृदयस्पर्शी दृश्य जे वन्यजीव छायाचित्रकार धनू परण यांनी टिपले होते.